इचरकलंजी: मातब्बर नेत्यांमुळे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाचे (gram panchayat election results 2021 ) चित्र क्षणाक्षणाला बदलत आहे. आता हातकणंगले तालुक्यात जनसुराज्य पाठोपाठ शिवसेनेने कमाल करुन दाखविली आहे. येथील मिणचे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. याठिकाणी शिवसेनाप्रणित प्रवीण यादव युवा शक्ती आघाडीने 13 पैकी 10 जागांवर बाजी मारली. या विजयानंतर मिणचे गावात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला.
राधानगरी तालुक्यात शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांच्याविरोधात सर्वपक्षीय एकटवले होते. त्यामुळे येथील निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, आता बारवे ग्रामपंचायतीमध्ये 9 पैकी सहा जागांवर शिवसेनाप्रणित पॅनलने विजय मिळवला. तर हातकणंगले तालुक्यातील बिरदेववाडी मध्ये 7 पैकी 6 जागा शिवसेनेला मिळाल्या आहे. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
पाटणमध्ये शिवसेनेचे राज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या गटाने 10 पैकी 6 ग्रामपंचायतींवर भगवा फडकला. उद्धव ठाकरे यांनी कोरोना संकट आणि महाराष्ट्रावर आलेल्या नैसर्गिक संकाटांच्या काळात केलेल्या कामाला मिळालेली ही पावती आहे. हे निकाल म्हणजे खेड्यापाड्यातील जनतेने उद्धव ठाकरे यांचे नेतृत्त्व स्वीकारल्याचं प्रतिक आहेत, असे शंभुराज देसाई यांनी सांगितले.
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा पहिला निकाल समोर आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातील पाडळी ग्रामपंचायतीवर जनसुराज्य पक्षाने बाजी मारली असून गोराई ग्राम विकास आघाडीच्या 11 जागा निवडून आल्या आहेत. यामुळे कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.
संबंधित बातम्या;
Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 LIVE | राज्यातील 10 मोठे निकाल, कुठे कोण जिंकलं?