मराठवाड्यातील एका गावात 25 वर्षानंतर पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणूक!

तब्बल 25 वर्षे ग्रामपंचायत निवडणूक माहिती नसलेल्या गावात यंदा मात्र ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडणार आहे.

मराठवाड्यातील एका गावात 25 वर्षानंतर पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणूक!
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 8:23 PM

औरंगाबाद: राज्यातील 14 हजारापेक्षा अधिक ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी अनेक नेते, मंत्री, लोकप्रतिनिधी प्रयत्न करत होते. त्यासाठी अनेकांनी लाखोंची बक्षिसंही जाहीर केली होती. त्यानुसार काही गावांनी यंदा ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा संकल्प केला आणि तो प्रत्यक्षात आणलाही. पण औरंगाबाद जिल्ह्यातील एका गावात 25 वर्षे बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतीसाठी यंदा मात्र निवडणूक पार पडत आहे. (Gram Panchayat elections in Talani village in Aurangabad district)

औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील तळणी या गावात तब्बल 25 वर्षांनंतर निवडणूक होत आहे. गेली 25 वर्षे सातत्याने या गावात बिनविरोध सरपंच निवडून दिला जात होता. त्यामुळे गावात ग्रामपंचायतीसाठी मतदानच होत नव्हतं. तब्बल 25 वर्षे ग्रामपंचायत निवडणूक माहिती नसलेल्या गावात यंदा मात्र ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडणार आहे. गावातील नवमतदारांनी निवडणुकीच्या माध्यमातूनच सरपंच निवडण्याचा निर्णय घेतल्यामुळे ही निवडणूक पार पडत आहे. त्यामुळे नवमतदारांना ग्रामपंचायत निवडणूक काय असते हे माहिती पडणार आहे.

अण्णा आणि पोपटरावांच्या गावातही यंदा निवडणूक!

आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी आणि पद्मश्री पुरस्कार विजेते पोपटराव पवार यांच्या हिवरे बाजार ग्रामपंचायतीच्या बिनविरोध निवडणुकीची परंपरा खंडित झाली आहे. अण्णा आणि पवारांना बिनविरोध निवडणूक घडवून आणण्यात अपयश आल्याने या दोघांच्याही वर्चस्वासाठी हा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

पोपटराव पवार यांचे हिवरे बाजार गाव आदर्श गाव म्हणून ओळखलं जातं. हिवरे बाजारमध्ये पोपटराव पवार यांचा शब्द अंतिम मानला जातो. त्यामुळे अवघ्या 7 सदस्यांच्या या ग्रामपंचायतीची प्रत्येकवेळी बिनविरोध निवडणूक होत होती. पोपटराव पवार सांगतील तसे गावकरी वागत होते. मात्र, यंदा ही परंपरा प्रथमच खंडित झाली असून सातही जागांसाठी निवडणूक होणार आहे. हिवरे बाजारमध्ये 1989 पासून सलग सहावेळा बिनविरोध निवडणूक झाली आहे. त्यामुळे आता 30 वर्षानंतर हिवरे बाजारमध्ये निवडणुका होत असून पवार यांच्या विरोधात परिवर्तन ग्रामविकास पॅनल मैदानात उतरले आहे.

अण्णा आणि लंकेना अपयश

राळेगणसिद्धीत बिनविरोध निवडणूक व्हावी म्हणून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि आमदार निलेश लंके यांनी कसोशीने प्रयत्न केले होते. त्यांच्या या मोहिमेला यशही आले होते. गावकऱ्यांची बैठक घेऊन बिनविरोध निवडणूक करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. मात्र, ऐनवेळी माशी शिंकली असून अण्णा आणि लंके यांच्या प्रयत्नांवर पाणी फेरले आहे. त्यामुळे राळेगणमध्ये निवडणूक होणार आहे.

संबंधित बातम्या:

70 वर्षांच्या आजी थेट निवडणुकीच्या रिंगणात, गाव पुढाऱ्यांना अद्दल घडवण्याचा निर्धार

ग्रामपंचायतीसाठी अर्ज मागे घेण्याची वेळ संपली; आता प्रचाराचं धुमशान!

Gram Panchayat elections in Talani village in Aurangabad district

Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....