Special Report : आजोबांनी क्रिकेटमध्ये चीअर लीडर्स दाखविल्या, बघुया नातू काय दाखवतात, नीलेश राणे यांचा टोला
पडळकर यांनी पवार घराण्याचं स्पोर्ट्समधील योगदानचं काढलं. पवार हे कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष होते. त्यांनी काही कुस्ती खेळली का.
मुंबई : शरद पवार यांच्यानंतर आता आणखी एक पवारानं क्रिकेटची धुरा हाती घेतली आहे. रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. पण, यावरून नीलेश राणे यांनी बोचरी टीका केली आहे. शरद पवार यांनी क्रिकेटमध्ये चीअर लीडर्स आणल्या. आता नातू काय आणणार, असा टोला नीलेश राणे यांनी लगावला. नीलेश राणे म्हणाले, रोहित पवार क्रिकेटमध्ये आलेत. आजोबांनी क्रिकेटमध्ये चीअर लीडर्स दाखविल्या. आता हे बघुया काय दाखवितात ते.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी रोहित पवार यांची बिनविरोध निवड झाली. भाजपच्या नीलेश राणे यांनी जळजळीत ट्वीट केलंय. अध्यक्षपदी निवड झाली. त्याबद्दल अभिनंदन.
पण, अध्यक्षपदी निवड होण्यामागे त्यांचं नेमकं योगदान काय, हे समजलं नाही, असा सवाल त्यांनी केला. रोहित पवार यांचं क्रिकेटमध्ये काही योगदान असेल असं वाटत नाही. येवढ्या मोठ्या पदावर जाण्यासाठी योग्यता लागते.
रोहित पवार यांनी ट्वीट करून प्रत्युत्तर दिलंय. राजकारणात येणारी माझ्यासारखी नवीन फळी सर्वपक्षीय नेत्यांचा आदर्श घेत असते. परंतु, नेतेचं असे वागणार असतील तर काय आदर्श घेणार.
हे असंच चालू राहिलं तर राजकारणाकडं पाहण्याचा युवांचा दृष्टीकोण निगेटिव्ह होऊन ते राजकारणापासून दुरावतील. तसं होऊ नये, याची सर्वपक्षीय नेत्यांनी दक्षता घ्यावी, असं रोहित पवार यांनी म्हंटलंय.
पवार घराण्याचा विषय म्हटल्यावर गोपीचंद पडळकर कसे शांत राहतील. पडळकर यांनी पवार घराण्याचं स्पोर्ट्समधील योगदानचं काढलं. पवार हे कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष होते. त्यांनी काही कुस्ती खेळली का.
अजित पवार हे कबड्डी संघटनेची अध्यक्ष आहेत. त्यांनी कधी कबड्डी खेळली का. सुप्रिया सुळे या खो-खो संघटनेच्या अध्यक्ष आहेत. त्यांनी कधी खो-खो खेळला का. रोहित पवार आता क्रिकेटचा अध्यक्ष झाला. आता रोहितला एक मॅच खेळायला लावा. पाच-दहा धावा काढू शकला तर त्याला तिथं ठेवा ना, असा टोला गोपीचंद पडळकर यांनी लगावला.