मोठी बातमी! आमदार रत्नाकर गुट्टेंचा नातू पुण्यातून बेपत्ता, घराबाहेर पडला अन्…
मोठी बातमी समोर येत आहे, आमदार रत्नाकर गुट्टे यांचा नातू पुण्यातून बेपत्ता झाला आहे. या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मोठी बातमी समोर येत आहे, आमदार रत्नाकर गुट्टे यांचा नातू बेपत्ता झाला आहे, पुण्यातून रत्नाकर गुट्टे यांचा नातू बेपत्ता झाला. गुट्टे यांच्या भाचीचा मुलगा सुमित भागवत गुट्टे वय वर्ष 24 हा एक जानेवारीपासून बेपत्ता झाला आहे. या प्रकरणी पिंपी चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. एक जानेवारीला सकाळी सुमित गुट्टे हा 9 वाजता घराबाहेर पडला होता, त्यानंतर तो घरी परतलाच नाही. ज्यूपीटर हॉस्पीटमध्ये मुलाखतीसाठी जात असल्याचं त्याने घरी सांगितलं होतं. मात्र त्यानंतर तो घरी परतलाच नाही.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, आमदार रत्नाकर गुट्टे यांचा नातू पुण्यातून बेपत्ता झाला आहे. ही घटना एक जानेवारी रोजी घडली. ज्यूपीटर हॉस्पीटमध्ये मुलाखतीसाठी जात असल्याचं त्याने सांगितलं त्यानंतर तो घराच्या बाहेर पडला, दोन तासांमध्ये येतो असंही तो म्हणाला होता, मात्र तो घरी परतलाच नाही. सुमित गुट्टेशी शेवटचं फोनवर बोलणं एक जानेवारीला दुपारी तीन वाजून तीन मिनिटांनी झालं होतं, त्यानंतर त्याचा फोन बंद आहे, अशी माहिती रत्नाकर गुट्टे यांनी दिली आहे. या प्रकरणात पिंपरी-चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
यावर प्रतिक्रिया देताना रत्नाकर गुट्टे यांनी म्हटलं की, माझा नातू मिसिंग आहे, त्यामुळे मी सध्या वेगळ्याच दु:खात आहे. माझा नातू मिसिंग असल्यामुळे मी परभणीमध्ये झालेल्या आक्रेश मोर्चात देखील सहभागी होऊ शकलो नाही. माझा नातू एक जानेवारीपासून मिसिंग आहे. माझ्या भाचीनं त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा फोन बंद आहे. तो एक जानेवारीला सकाळी 9 वाजता घराबाहेर पडला होता. मी याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो आहे. एक जानेवारीला दुपारी तीन वाजून तीन मिनिटांनी त्याच्याशी शेवटचं बोलणं झालं होतं. मात्र त्यानंतर तो बेपत्ता झाला, या प्रकरणात पिंपरी-चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे, असं गुट्टे यांनी सांगितलं.