पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मराठी शुभेच्छा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संकल्प काय?
हिंदु नववर्षानिमित्त आज महाराष्ट्रात घरोघरी गुढी उभारून नवीन वर्षाचे स्वागत केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला विशेष शुभेच्छा दिल्या आहेत.
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष, दिवसेंदिवस बदलत जाणारी राजकीय समीकरणं, पक्षा-पक्षांतील चढाओढ या सगळ्यात येणारा प्रत्येक दिवस, प्रत्येक महिना, वर्ष प्रत्येक पक्षासाठी महत्त्वाचा आहे. कायम मिशन मोडवर असलेल्या भाजपकडून (BJP) नेहमीच जनतेच्या भावनांच्या अनुषंगाने सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात. अगदी केंद्रीय नेतृत्वापासून गाव पातळीवरील भाजप नेतेही एखादी मोहीम राबवल्याप्रमाणे यात सहभागी होतात. याच मालिकेत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी महाराष्ट्रातील जनतेला गुढीपाडव्यानिमित्त स्पष्ट मराठीत शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळीच एक ट्विट करून महाराष्ट्रातील जनतेच्या नावाने संदेश दिला आहे. गुढी पाडव्याच्या या मंगल प्रसंगी आपणा सर्वांना माझ्या शुभेच्छा.. अशा शब्दात मोदींनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देताना एक फोटो ट्विट केला आहे. येणारे वर्ष समृद्धीचे आणि तुमच्या सर्व आशा आकांक्षांच्या पूर्ततेचे जावो, या शुभेच्छा.. असा संदेश देत त्यावर मोदी यांची स्वाक्षरीदेखील आहे.
गुढीपाडव्याच्या या मंगल प्रसंगी, आपणां सर्वांना माझ्या शुभेच्छा. pic.twitter.com/BDfKtXBvPO
— Narendra Modi (@narendramodi) March 22, 2023
मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा काय?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा दिल्या. कोरोनामुळे आपल्या सणावर व आपल्यावर निर्बंध आलेले होते. सरकारने गोविंदा दहीहंडी गणपती नवरात्र उत्सव दिवाळी असं सगळे सण महाराष्ट्राच्या जनतेने एका आनंदाने उत्साहाने जल्लोषात साजरा केलेले आहेत. आणि आजचा हा गुढीपाडवादेखील मोठ्या उत्साहामध्ये आपण साजरा करत आहोत….
शोभायात्रेत हजारो ठाणेकर
मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील गुढीपाडव्यानिमित्तच्या शोभायात्रेत हजेरी लावली. ते म्हणाले, ‘ आपण सर्व शोभायात्रा मध्ये हजारो ठाणेकर नागरिक याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. अनेक चित्ररथ त्यांच्या माध्यमातून सामाजिक महान समोर प्रबोधनाचं काम या ठिकाणी विविध चित्रे त्यांच्या माध्यमातून विविध विषय घेतले आहेत. सामाजिक धार्मिक शैक्षणिक समाज प्रबोधनाचे विषय हे सगळे विषय या चित्रपटाच्या माध्यमातून विविध सेवाभावी संस्था आहेत यामध्ये सहभागी घेतलेला आहे. विशेष मला खूप आनंद आहे या शोभयात्रेमध्ये अनेक वर्ष मी या सहभागी होतो म्हणून यावर्षी मुख्यमंत्री म्हणून सहभागी होण्यासाठी खूप वेळ आनंद आहे.
मुख्यमंत्र्यांचा संकल्प काय?
नवीन वर्षानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय संकल्प केला यावर विचारले असता ते म्हणाले, अर्थसंकल्पामध्ये माझाही संकल्प मांडलेला आहे. या राज्याचा अर्थसंकल्प संपूर्ण सर्वसमावेशक आहे. त्यामध्ये सर्व घटकांमध्ये न्याय देण्याचं काम या अर्थसंकल्पात देण्याचे काम केले आहे. शेतकरी कष्टकरी, कामगार महिला भगिनी तरुणाई सगळ्यांचा विचार या अर्थसंकल्पात करण्यात आलेला आहे. राज्याचा सर्वांगीण विकास हाच ध्यास आमचा आहे. आज खूप आनंदाचं वातावरण आहे. अनेक ठिकाणचे अनेक वर्षांपासूनचे विषय मार्गी लागत आहेत.