शिंदे गटातील नाराजीवर अखेर पालकमंत्री दादा भुसे बोलले, नाराजीवर भुसे यांची गुगली ?
नाशिकनाधील नांदगाव मतदार संघातील आमदार सुहास कांदे यांनी पत्रकार परिषदेत दादा भुसे यांच्यासह हेमंत गोडसे यांच्यावर नाराजीचे आरोप करत उघडपणे प्रतिक्रिया दिली होती.
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटात नाराजी असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामध्ये शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. पत्रकार परिषद घेऊन विश्वासात घेतले जात नाही, बैठकांना आणि पक्षातील निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी कांदे यांच्या नाराजीवर पालकमंत्री भुसे आणि खासदार हेमंत गोडसे यांनी बोलणं टाळलं होतं. यामध्ये स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लक्ष घालतील असंही भुसे यांनी म्हणत तेथ बोलणं टाळलं होतं. नाशिक जिल्ह्यात शिवसेनेच्या शिंदे गटाने बाळसंही धरलेले नसतांना धुसफूस सुरू झाल्याने डोक्याची घंटा मानली जात आहे. दरम्यान, यावर दादा भुसे यांनी आमच्यात सर्व काही आलबेल असल्याचा दावा केल्यानं भुसे यांनी गुगली तर टाकली नाही ना ? अशी चर्चा सुरू झाली आहे.
नाशिकनाधील नांदगाव मतदार संघातील आमदार सुहास कांदे यांनी पत्रकार परिषदेत दादा भुसे यांच्यासह हेमंत गोडसे यांच्यावर नाराजीचे आरोप करत उघडपणे प्रतिक्रिया दिली होती.
दादा भुसे यांनी नाशिकमधील शिंदे गटात नाराजीचा सुर असला तरी भुसे यांनी सगळं काही आलबेल असल्याचा दावा करत असतांना सर्वांना सोबत घेऊनच काम करत असल्याचा दावा केला आहे.
पालकमंत्रीपदी दादा भुसे मंत्रालयात असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर हेमंत गोडसे यांनी बैठक घेतली होती, त्यावरूनही शिंदे गटात नाराजी असल्याचे दिसून येत आहे.
नाशिकमधील शिंदे गटाला सत्ता येऊन चार महीने उलटले असले तरी फारसे मोठे नेते कुणीही सहभागी झाल्याचे दिसत नाही त्यातच नाराजीचे फटाके दिवाळीनंतरही फुटू लागल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.