गुलाबी थंडीत नाशिकचं वातावरण दादांनी तापवलं, काय आहे कारण…
खड्ड्यांनी त्रस्त असलेल्या नागरिकांना धुळीचाही सामना करावा लागत असल्याने खड्ड्यातून फुफाट्यात गेल्याची परिस्थिती नाशिककरांची झाली आहे.
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहर आणि शहरातून जाणाऱ्या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. शहरातील खड्डयांनी नाशिककर त्रस्त झाले आहेत. अशातच माजी पालकमंत्री आणि विद्यमान पालकमंत्री यांनी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांवरून प्रशासनाला धारेवर धरले आहे. मागील महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांची अक्षरशः वाताहत झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर नाशिक मुंबई महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांवरून छगन भुजबळ आक्रमक झालेले पालकमंत्री दादा भुसे आणि मनपा प्रशासन यांच्यामध्ये रात्री उशिरा झालेल्या बैठकीत दादा भुसे आक्रमक झालेले होते. पंधरा दिवसांत खड्डे बुजवा अन्यथा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करेल असा इशारा दिला आहे.
यंदाच्या वर्षी नाशिकसह राज्यात मुसळधार पाऊस झाला आहे, त्यामध्ये ठिकठिकाणी रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे.
नाशिक शहरात तर दोन दोन फुटापर्यंत रस्त्यावरून खड्डे आढळून आले आहे, काही ठिकाणी तर रस्ता खचल्याने ट्रक अडकून पडली होतो.
पावसाळ्यात पडलेल्या खड्ड्यांनी नागरिक त्रस्त असतांना शहरात पडलेले खड्डे आणि त्यानंतर रस्त्यावर असलेली धूळ त्यामुळे नागरिक त्रस्त आहे.
खड्ड्यांनी त्रस्त असलेल्या नागरिकांना धुळीचाही सामना करावा लागत असल्याने खड्ड्यातून फुफाट्यात गेल्याची परिस्थिती नाशिककरांची झाली आहे.
पालकमंत्री दादा भुसे यांनी मनपा प्रशासनाकडून शहरातील परिस्थितीचा आढावा घेत असतांना रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा आढावा घेतला आहे.
त्यामध्ये मागील पंधरा दिवस झाले तेव्हाच सूचना देऊनही शहरातील परिस्थिती न बदलल्याने पालकमंत्री दादा भुसे बैठकीतच आक्रमक झाले होते.
आता त्यांनी मनपा प्रशासनाला पंधरा दिवसांची मुदत दिली असून खड्डे बुजवा अन्यथा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करेल असा इशारा दिला आहे.
एकीकडे भुजबळ महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांबाबत आक्रमक असतांना दुसरीकडे शहरातील खड्ड्यांवरून दादा नभूसे देखील आक्रमक झाले आहे.