Dattatraya Bharane : ‘पालकमंत्री बदलणे म्हणजे बाजारातला भाजीपाला असतो का?’ दत्तात्रय भरणे संतापले; उजनीचं पाणी पळवल्याचा आरोपावर सविस्तर उत्तर

सोलापूरमधील पाणी प्रश्नावर बोलताना पालकमंत्री भरणे म्हणाले, सोलापूरला चार दिवसाला पाणी पुरवठा होतो ही माझ्यासाठी शोकांतिका आहे. समांतर जलवाहिनीचा प्रश्न येत्या 8 दिवसात निकाली काढला जाईल. पंधरा महिन्यात समांतर जलवाहिनी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Dattatraya Bharane : 'पालकमंत्री बदलणे म्हणजे बाजारातला भाजीपाला असतो का?' दत्तात्रय भरणे संतापले; उजनीचं पाणी पळवल्याचा आरोपावर सविस्तर उत्तर
पालकमंत्री दत्तात्रय भरणेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 28, 2022 | 5:36 PM

सोलापूरला : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi Government) तिन्ही पक्षात काहीना काही होतच असतं. आता सोलापूरच्या उजनी धरण (Ujani Dam)धरणातील पाण्याच्या वाटपावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद होताना दिसत आहे. तर सोलापूरकरांचा विरोध डावलून या धरणाचे पाणी इंदापूर व बारामती तालुक्यास नेण्याची होत असल्याचे सांगत काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Guardian Minister Dattatraya Bharane) अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. तसेच त्यांनी सोलापूरकरांच्या हक्काचे पाणी कोणी पळवत असेल तर आम्ही राज्यात रान पेटवू, असा इशाराही आ. प्रणिती शिंदे यांनी दिला होता. त्यावर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पलवार केला आहे. तसेच पालकमंत्री बदलांच्या चर्चेवर उद्वीग्न प्रतिक्रिया दिली आहे.

बाजारातला भाजीपाला असतो काय?

सोलापूरकरांच्या पाण्याच्या प्रश्नावरून सध्या राजकारण तापले असतानाच पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर टीका होत आहे. तर दुसरीकडे पालकमंत्री बदलाच्या चर्चा सोलापूरसह राज्याच्या राजकारणात रंगल्या आहेत. त्यावर आता भरणे यांनी उद्वीग्न प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, पालकमंत्री बदलणे म्हणजे काय बाजारातला भाजीपाला असतो काय? पत्रकाराने जबाबदारीने बातमी दिली पाहिजे. पालकमंत्री बदलणे एवढे सोप्पे नसते. पालकमंत्री हा जिल्ह्याचा प्रमुख असतो. जिल्ह्याची, शहराची काळजी घेणे ही त्याची जबाबदारी असते.

स्वतः प्रकाशझोतात राहण्याचे काम

तर उजनी पाणी पळविण्याच्या आरोपावरून पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पलवार केला आहे. ते म्हणाले लाकडी निंबोळी योजना ही जुनीच आहे. उगाच अशा मुद्द्यावर राजकारण करु नये. निवडणूक असताना राजकारण ठीक आहे. पण आता कशातच काय नसताना विनाकारण लोकांचा गैरसमज करणे हे काही लोकांचे कामच आहे. तर आंदोलन करुन, वातावरण तापवून स्वतः प्रकाशझोतात राहण्याचे काही लोकांचे काम सुरू असतेच. तसेच लाकडी निंबोळी ही योजना नवीन असती तर निश्चित दोष माझा असता मात्र ही जुनी योजना आहे त्याला पैसे मंजूर करण्यात आले आहेत. तर या योजनेप्रमाणेच मंगळवेढा, बार्शीसाठीच्या योजनादेखील लवकरच मार्गी लागतील. त्यांना सुप्रमा देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

हे सुद्धा वाचा

गैरसमज झाला असावा

तर काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी केलेल्या टीका आणि इशाऱ्याबद्दल बोलताना पालकमंत्री भरणे म्हणाले की, टीकाकारांनी अभ्यास करुन बोलावे. आ. प्रणिती शिंदे यांचा गैरसमज झाला असावा. जसा तुमचा गैरसमज (पत्रकारांचा) झाला तसा त्यांचा पण गैरसमज झाला असावा. प्रणिती शिंदे या आमच्यापेक्षा ज्येष्ठ आमदार असून अभ्यासू आहेत. तर शिंदे या शासनाच्या प्रतिनिधी असून त्यांनी शासनाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असेल त्यामुळे आता त्यांचा गैरसमज दूर झाला असेल असं मला वाटतं.

ही माझ्यासाठी शोकांतिका

तर सोलापूरमधील पाणी प्रश्नावर बोलताना पालकमंत्री भरणे म्हणाले, सोलापूरला चार दिवसाला पाणी पुरवठा होतो ही माझ्यासाठी शोकांतिका आहे. समांतर जलवाहिनीचा प्रश्न येत्या 8 दिवसात निकाली काढला जाईल. पंधरा महिन्यात समांतर जलवाहिनी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही योजना पूर्ण झाल्यानंतर सोलापूर शहराला दररोज पाणीपुरवठा होईल. तर ज्या व्यक्तीला टेंडर दिले होते तो चुकीचा निघाला. त्याने अतिरिक्त पैशांची मागणी केली त्यामुळे त्याचे टेंडर रद्द करुन नव्याने टेंडर काढले आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.