गद्दार-गद्दार ऐकून लोकं बोअर झाली म्हणत गुलाबराव पाटील पाटील स्पष्टच बोलले, आदित्य ठाकरे यांना पर्यायच सांगितला..
गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधत असताना सात महिने झाले एकच पिक्चर सुरू आहे. लोक आता बोअर झाली आहे, काहीतरी वेगळं करा म्हणून आदित्य ठाकरे यांना डिवचलंय.
अनिल केऱ्हाळे, टीव्ही 9 मराठी, जळगाव : गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आमदार आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांवर हल्लाबोल करत आहेत. हिम्मत असेल तर राजीनामा द्या, निवडणुकीला सामोरे जा अशा पद्धतीचे खुलं आव्हान देत आहे. यावरच बोलत असताना आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांचा गद्दार असा उल्लेख करत आहे. त्यावरच मंत्री गुलाबराव पाटील ( Gulabrao Patil ) यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे.
गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधत असताना सात महिने झाले एकच पिक्चर सुरू आहे. लोक आता बोअर झाली आहे, काहीतरी वेगळं करा म्हणून आदित्य ठाकरे यांना डिवचलंय.
इतकंच काय आदित्य ठाकरे यांना गुलाबराव पाटील यांनी सल्ला देखील दिला आहे. गुलाबराव पाटील म्हणाले, आत्ता जो पक्ष राहिला आहे, त्या पक्षाला बळकटी देण्यासाठी प्रयत्न करा, निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी करा असा सल्ला दिला आहे.
आदित्य ठाकरे यांना जे मिळालं आहे त्यातून पक्ष उभा करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि आम्हाला चितपट करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. शेवटी निवडून येण्याला महत्व आहे असेही गुलाबराव पाटील म्हणाले आहे.
आदित्य ठाकरे यांनी त्यांचे लोकं निवडून येण्यासाठी प्रयत्न करावे, आम्हाला पाडण्याचा प्रयत्न करावा असेही पाटील म्हणाले. तर आदित्य ठाकरे यांना काही गोष्टीचा साक्षात्कार झाला असेल तर त्याला अर्थ नाही असेही गुलाबराव पाटील म्हणाले आहे.
याशिवाय एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री होऊन 210 दहा दिवस झाले आहे. त्यामुळे त्यांच्या आरोपाला अर्थ नाही आणि आदित्य ठाकरे जर असे बोलत असतील तर त्याबाबत माहिती नाही म्हणत बंडखोरीवर गुलाबराव पाटील यांनी बोलणं टाळलं आहे.
पण दुसरीकडे आदित्य ठाकरे यांच्या आरोपावर बोलत असतांना गुलाबराव पाटील यांनी गद्दार – गद्दार बोलून लोकं बोअर झाली म्हणत केलेल्या टीकेवर आदित्य ठाकरे काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी मी राजीनामा देतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देऊन वरळीत येऊन निवडणूक लढवावी असे आव्हान दिले होते. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी थेट ठाण्यात येऊन निवडणूक लढवतो म्हणत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आव्हान दिले होते.