गुणरत्न सदावर्ते यांचा भुजबळ यांना सल्ला, तर जरांगे पाटील यांना डिवचलं, म्हणाले ‘तर… डेड END म्हणावे लागेल’
आपण जेव्हा म्हणता ओबीसी सोडून आरक्षण द्या तेव्हा लक्षात घ्या आपण मान्य करता का मराठा मागास आहे. आणखीन वेगळं मागास आरक्षण त्यांना द्या. एकदा आपण मागास आहे हे मान्य केले तर तो एसटी एनटीत जाऊ शकत नाही. तो ओबीसीत जाऊ शकतो.
मुंबई | 7 नोव्हेंबर 2023 : मराठा समाज हा मुळामध्ये शेवटचे जे आयोग आहेत सन्माननीय सेवानिवृत्त न्यायमूर्ती गायकवाड यांच्या गायकवाड आयोगाने मागास ठरवला होता ते माननीय सर्वोच्च न्यायालयाने नाकारला. तोच समाज तीच व्यक्ती पुन्हा आपण वेगळ्या घटकात मी मागास आहे असं म्हणणं आणि असं मान्य करणं हे चुकीचे आहे. कोणत्या आयोगाचा निर्णय आज मराठा मागास म्हणून नाहीये तेव्हा मराठा म्हणून सुद्धा आपल्याला मागास म्हणून आरक्षण देता येणार नाही. माणसं आपली मराठा भाऊ होते ती मागास ठरत नाही किंवा ते म्हणणे आरक्षण देता येत नाही असे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले.
कुंभार, लोहार यासारखं मागासलेपण मराठ्यांचं ठरत नाही. त्यामुळे त्यांना मागास कुणबी प्रमाणपत्र देता येत नाही. या गोष्टी भुजबळ साहेबांना समजल्या पाहिजे. ते मागास ठरत नसल्यामुळे छगन भुजबळ यांनी स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. मराठा भावांना आरक्षण देताच येत नाही. ओबीसी म्हणून मराठा म्हणून ही आरक्षण देता येणार नाही असे सदावर्ते म्हणाले.
मी राजकारणी माणूस नाही आता जी दिलेली प्रमाणपत्र आहेत ही मागास संहितेमध्ये ठरत नाही म्हणून न्यायालयीन भूमिका मांडणार. राजकारण आणि एकत्रीकरण यासाठी आरक्षण नाही. ट्रॅक्टर मोर्चा, बीएमडब्ल्यू मोर्चा अशा सुख सोयी वस्तू त्यांच्याकडे आहेत. त्यांनी याचा विचार केला पाहिजे. ज्यांच्यासाठी हे आरक्षण आहे त्यांना समूहात येण्याचा जो मार्ग आहे तो डेड END म्हणावे लागेल असे ते म्हणाले.
छगन भुजबळ यांनी ओबीसीचे सोडून आरक्षण द्या हा डायलॉग सोडावा. आपण जेव्हा म्हणता ओबीसी सोडून आरक्षण द्या तेव्हा लक्षात घ्या आपण मान्य करता का मराठा मागास आहे. आणखीन वेगळं मागास आरक्षण त्यांना द्या. एकदा आपण मागास आहे हे मान्य केले तर तो एसटी एनटीत जाऊ शकत नाही. तो ओबीसीत जाऊ शकतो. यामुळे तुम्ही थेट भूमिका घ्या मराठा आरक्षण देता येत नाही अशी भूमिका घ्यावी असा सल्ला त्यांनी छगन भुजबळ यांना दिला.
मराठा समाजाने धमक्या तोडफोड करू नये दुसऱ्या अर्थानेही मराठा आरक्षण मान्य केले जाऊ शकणार नाही. माझ्या याचिकेत 1996 ला आणि 2018 ला जो निकाल दिला, जे जिम्मेदार पुढारी आहेत त्यांच्यामुळे आंदोलन होतात. ज्यांच्यामुळे आंदोलन झाले ते मनोज जरांगे, उद्धव ठाकरे, शरद पवार ज्यांनी हिंसक आंदोलन केलं त्यांनाही पार्टी केले आहे. सरकारला भरपाई मिळावी ही आमची भूमिका. ज्यांचे बीडमध्ये नुकसान झालंय त्यांनी उच्च न्यायालयामध्ये आपली भूमिका मांडावी असे आवाहनही सदावर्ते यांनी केले.