Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संतोष देशमुखप्रकरणापेक्षाही गुंड्या गायकवाडांचा खून… गुणरत्न सदावर्तेंचा सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप काय?

जितेंद्र आव्हाड साहेबांनी गुंड्या गायकवाड साहेब जे मागासवर्गीय होते यांची हत्या झाली त्यांच्यावर बोलायचं. अगोदर झालेले खून काय खून नव्हते का? त्यातून काय रक्त निघत नव्हतं का? त्या रक्ताला काय किंमत नव्हती?" असा सवालही गुणरत्न सदावर्ते यांनी केला.

संतोष देशमुखप्रकरणापेक्षाही गुंड्या गायकवाडांचा खून... गुणरत्न सदावर्तेंचा सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप काय?
Gunaratna Sadavarte suresh dhas
Follow us
| Updated on: Jan 31, 2025 | 5:12 PM

Gunaratna Sadavarte On Suresh Dhas : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणातील सात आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई केली जात आहे. तर एक आरोपी अद्याप फरार आहे. या प्रकरणानंतर बीडमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेनंतर अनेक प्रकरण समोर येत आहेत. त्यातच आता ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी भटक्या विमुक्त समाजातील आदिवासी मागास समाजातील गुंड्या गायकवाड यांच्या हत्येबद्दल प्रश्न उपस्थितीत केले आहेत. यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी आमदार सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

“हा देश संविधानावर चालतो. कोणाची जात उच्च आणि नीच आहे, अशी कोणतीही तरतूद या संविधानामध्ये नाही. आरोपी हा आरोपी आहे, मग तो कोणीही असो कोणत्याही जाती धर्माचा असो आरोपी हा आरोपी असतो. भटक्या विमुक्त समाजातील आदिवासी मागास समाजातील गुंड्या गायकवाड साहेब यांचा जो खून झाला, हे प्रकरण बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणापेक्षा देखील गंभीर आहे. कशाप्रकारे हत्यारे तयार करण्यात आली ते धस यांचे शेत होतं का?” असा सवाल गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.

“गुंड्या गायकवाड मर्डर केस धस यांच्या कुटुंबाचा सहभाग”

“सुरेश धस यांच्या पत्नीने तीन लाख रुपये पाठवले होते, ती रक्कम जप्त होते. केंद्र हे तपासातील अधिकारी ते मेन विटनेस आहेत. ते डंके की चोट पे सांगत आहेत धस यांना आज देशमुख प्रकरणावर बोलण्यासाठी तोंड राहिलेले नाही. धस कोण आहेत हे मराठा समाजाचे आहेत. उच्च जातीचे आहेत. ते तत्कालीन मंत्री होते हे काहीही मायने राखत नाही. त्यांच्या कुटुंबाचे इन्व्हॉलमेंट गुंड्या गायकवाड मर्डर केसमध्ये असेल तर बाबतीत पूर्णपणे छडा लागला पाहिजे”, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली.

“पोलीस अधिकारी केंद्रे यांचे स्टेटमेंट रेकॉर्ड करून पुन्हा तपास पुढे घेऊन गेले पाहिजे. सुरेश धस यांच्या पत्नीने आरोपीला तीन लाख रुपये केसमधून काढता पाय घेण्यासाठी दिली असेल, हत्यारे धसांच्या शेतातून जप्त केले असतील, आरोपीला पकडण्यापासून मज्जाव केला असेल तर त्यांचे इन्वॉलमेंट आहे”, असाही गंभीर आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला.

अगोदर झालेले खून काय खून नव्हते का?

“जितेंद्र आव्हाड यांना परत सांगतो, तुम्ही घसा कोरडा करून ओरडत होता तर या बाबतीमध्ये तर तुम्हाला आता बोललच पाहिजे. ठाण्यात येऊन ठणकावून डंके की चोट पे सांगतो अगोदर जितेंद्र आव्हाड साहेबांनी गुंड्या गायकवाड साहेब जे मागासवर्गीय होते यांची हत्या झाली त्यांच्यावर बोलायचं. अगोदर झालेले खून काय खून नव्हते का? त्यातून काय रक्त निघत नव्हतं का? त्या रक्ताला काय किंमत नव्हती?” असा सवालही गुणरत्न सदावर्ते यांनी केला.

“सुरेश धस हे लोकशाही मधून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. ते तत्कालीन मंत्री होते. त्यांनी मंत्री पदाचा गैरवापर केला होता. म्हणून सभापती महोदयांनी चौकशी करावी. मी पोलीस महासंचालकांना विनंती करतो. आम्ही न्यायालयामध्ये जाण्याच्या अगोदर सुरेश धस आणि त्यांची पत्नीबद्दल तातडीने पावले उचलावीत. धसांना अटक करावी”, अशी मागणीही गुणरत्न सदावर्ते यांनी केली.

सुप्रिया सुळेंचा थेट निशाणा, महाराष्ट्राची बदनामी या दोन लोकांमुळेच...
सुप्रिया सुळेंचा थेट निशाणा, महाराष्ट्राची बदनामी या दोन लोकांमुळेच....
'एक मिनिटं, पुण्यात असताना बीडचे प्रश्न का', मुंडे पत्रकारावरच भडकल्या
'एक मिनिटं, पुण्यात असताना बीडचे प्रश्न का', मुंडे पत्रकारावरच भडकल्या.
'खरा आका..', CIDच्या आरोपपत्रातून कराडच नाव समोर येताच धसांकडून पोलखोल
'खरा आका..', CIDच्या आरोपपत्रातून कराडच नाव समोर येताच धसांकडून पोलखोल.
'कराड देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाईंड', CIDच्या आरोपपत्रात काय म्हटल?
'कराड देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाईंड', CIDच्या आरोपपत्रात काय म्हटल?.
'... हे जगजाहीर आहे', रोहित पवारांकडून CM देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन
'... हे जगजाहीर आहे', रोहित पवारांकडून CM देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन.
स्वारगेट बस स्थानकात महिलांचं तिरडी आंदोलन अन् आरोपीच्या फाशीची मागणी
स्वारगेट बस स्थानकात महिलांचं तिरडी आंदोलन अन् आरोपीच्या फाशीची मागणी.
महिन्याच्या पहिल्या दिवशी सिलिंडरचे दर वाढले, किती रूपये मोजावे लागणार
महिन्याच्या पहिल्या दिवशी सिलिंडरचे दर वाढले, किती रूपये मोजावे लागणार.
शनिशिंगणापूरच्या शनिला आजपासून ब्रँडेड तेल, देवस्थानाचा मोठा निर्णय का
शनिशिंगणापूरच्या शनिला आजपासून ब्रँडेड तेल, देवस्थानाचा मोठा निर्णय का.
इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना प्रशांत कोरटकरने दिली धमकी?
इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना प्रशांत कोरटकरने दिली धमकी?.
'ना जबरदस्ती ना धक्काबुक्की... दोघांमध्ये सहमतीने शारीरिक संबंध'
'ना जबरदस्ती ना धक्काबुक्की... दोघांमध्ये सहमतीने शारीरिक संबंध'.