Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, आता कोल्हापूर, पुणे की बीड?

गुणरत्न सदावर्तेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सातारा कोर्टाने दिली आहे. मात्र आता कोल्हापूर, पुणे, किंवा बीड पोलीस सदावर्तेंना ताब्यात घेण्याची शक्यता आहे. कारण या ठिकाणीही सदावर्तेंवर गुन्हे दाखल झाले आहेत.

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, आता कोल्हापूर, पुणे की बीड?
गुणरत्न सदावर्ते यांना अटकेपासून दिलासाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 7:01 PM

सातारा: गुणरत्न सदावर्तेंना (Gunratna Sadavarte) 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सातारा कोर्टाने दिली आहे. मात्र आता कोल्हापूर, पुणे, किंवा बीड पोलीस सदावर्तेंना ताब्यात घेण्याची शक्यता आहे. कारण या ठिकाणीही सदावर्तेंवर गुन्हे दाखल झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) आंदोलनावेळी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता त्यांच्यावर राज्यात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाल्याने सदावर्तेंच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्यांच्या अडणींची सुरूवात मुंबईतल्या एसटी आंदोलनापासून (St Worker Protest) सुरू झाली. त्यानंतर अडचणींचा पाढा वाढतच गेला आहे. त्यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे यांच्याबात वादग्रस्त विधान केल्याच्या आरोपात सातारा पोलिसांनी त्यांना मुंबईतून ताब्यात घेतले होते. आधी मुंबईत ते चार दिवस एसटी आंदोलनाप्रकरणी कोठडी मुक्कामी राहून गेले आहेत.

पाच मिनिटात फैसला

सातारा जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी सुरु झाल्यानंतर अवघ्या 5 मिनिटात सदावर्तेंवरती निकाल दिला आहे. बचाव पक्षाचे वकील श्याम प्रसाद बेगमपुरे यांच्या केलेल्या युक्तीवादात नैसर्गिक तपास झाला आहे, तसेच रिमांडमध्ये दाखवलेली कारणे ही पोलीस कोठडीसाठी पुरेशी नसल्याचे युक्तीवादात श्यामप्रसाद बेगमपुरे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. तसेच गेली चार दिवस ते कोठडीत असल्याने त्यांच्या मागे कोणाचा हात आहे वगैरे हे पाहणे पोलिसांना शक्य होते. घडला प्रकार हा दीड वर्ण अगोदरचा असून चार दिवस मिळालेली कोठडी हीच जास्त आहे. या युक्तीवादाच्या आधारावर आज सदावर्तेंना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनवाली आहे.

दुसरीकडचे पोलीस ताब्यात घेणार?

एसटी आंदोलनाप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना पहिल्या वेळी मुंबईत अटक झाली. त्यानंतर त्यांच्यावर सातारा, कोल्हापूर, बीड, पुणे, अशा विविध ठिकाणी गुन्हे दाखल होत गेले. हे गुन्हे एसटी आंदोलन आणि मराठा आरक्षणासंबंधीच्या प्रकरणांमध्ये दाखल झाले आहेत. मुंबईतील कोर्टानेही सादवर्तेंना न्यायालयीन कोठीडी सुनवल्यानंतरच सातारा पोलिसांना त्यांचा ताबा मिळाला होता. त्यामुळे आता साताऱ्यातील कोर्टानेही त्यांना कोठडी सुनावल्यानंतर इतर कोणत्या ठिकाणचे पोलीस सदावर्तेंचा ताबा घेणार का? त्यांना पुन्हा त्या प्रकरणात अटक होणार का? हेही पाहणं तेवढचं महत्वाचं ठरणार आहे. तर सरकार हे केवळ सुडापोटी करत आहे. मला दडपण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. माझ्या जिवाला धोका आहे. असे आरोप वारंवार सदावर्ते यांच्याकडून करण्यात येत आहेत.

सदावर्तेंच्या पत्नीला मात्र तुर्तास दिलासा

मुंबईतल्या एसटी आंदोलन प्रकरणात फक्त गुणरत्न सदावर्तेच नाही तर त्यांच्या पत्नी वकील जयश्री पाटील यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. मात्र कोर्टाने त्यांना तुर्तास तरी अटकेपासून संरक्षण देत 29 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात एसटी कर्मचाऱ्यांकडून कोट्यवधी रुपये लाटल्याचा तसेच आंदोलनाचा कट रचल्याचा आरोप या वकील पती-पत्नीवर आहे.

Sanjay Raut Rokhthok : किरीट सोमय्यांवर हल्लाबोल, भाजपला इशारा, तर मनसेवर घणाघात; संजय राऊतांचे 5 रोखठोक मुद्दे

Jayant Patil: आपली ताकद प्रचंड आहे, आपण भिडलो तर विरोधकांचा टिकाव लागणार नाही: जयंत पाटील

Jayashree Patil : जयश्री पाटील यांना मोठा दिलासा, 29 एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.