Gunratna Sadavate : गुणरत्न सदावर्तेंच्या घरी थेट पैसे मोजण्याची मशीन! सरकारी वकिलांचा दावा; लाखो रुपयांची मालमत्ता खरेदी कुणाच्या पैशातून?

वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोठडी मुक्कामी असणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्या घरी पैसे मोजायची मशील सापडली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नवं ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.

Gunratna Sadavate : गुणरत्न सदावर्तेंच्या घरी थेट पैसे मोजण्याची मशीन! सरकारी वकिलांचा दावा; लाखो रुपयांची मालमत्ता खरेदी कुणाच्या पैशातून?
गुणरत्न सदावर्तेंची पैसे घेतल्याची कबुली, सरकारी वकिलांचा दावाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 4:40 PM

मुंबई : वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोठडी मुक्कामी असणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्या घरी पैसे मोजायची मशील (Money Counting Machine) सापडली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नवं ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. गुणरत्न सदावर्ते सध्या वेगवेगळ्या गुन्ह्यात कोठडी मुक्कामी आहे. या कोठडी मुक्कामाची सुरूवात मुंबईतील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनापासून झाली. गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घराबाहेर आंदोलन भडकावल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर मुंबईत सुरूवातील गुन्हा दाखल झाला. मुंबईत पोलिसांच्या कोठडीत चार दिवस काढल्यावर गुणरत्न सदावर्तेंना सातारा पोलिसांच्या काठडीत जावं लागलं. त्यानंतर त्यांनी सातारा पोलिसांच्या कोठडीत चार दिवस काढले. मात्र आता ही पैसे मोजायची मशील सापडल्याने राज्यात सध्या पुन्हा खळबळ माजली आहे.

कर्मचाऱ्यांच्या पैशातून मालमत्ता घेतल्याचाही आरोप

सरकारी वकील यांनी कोर्टात युक्तीवाद केला. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या पैशातून गुणरत्न सदावर्ते यांनी मालमत्ता घेतल्याचा आरोपही करण्यात आलेला आहे. सरकारी वकील प्रदीप घरत हे कोर्टात सध्या सरकारी पक्षाची बाजू मांडत आहेत. तर सदावर्तेंकडून अनेक वकीलांनी युक्तीवाद केला आहे.

कुठे कुठे मालमत्ता घेतल्याचा आरोप?

  1. परळमध्ये गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून घेतलेल्या पैशातून 60 लाखांची जागा घेतल्याचा आरोप करण्यात आलाय.
  2. तसेच याच पैशातून सदावर्ते यांनी भायखळ्यातही मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप करण्यात आलाय.
  3. गुणरत्न सदावर्ते यांनी याच पैशातून नवीन गाडी खरेदी केल्याचेही सरकारी वकीलांनी कोर्टातील युक्तीवादादरम्यान म्हटले आहे.
  4. याची चौकशी करण्यासाठी पोलिसांना आणखी कोठडी हवी असल्याचीही सरकारी वकील प्रदीप घरत यांनी यावेळी मागणी केली.
  5. तर दुसऱ्या एका प्रकरणात गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा द्यावा यासाठी कोल्हापूर पोलिसांनीही गिरगाव कोर्टात अर्ज केला होता.

पोलीस तपासात सहकार्य नाही

सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यात काही एसटी कर्मचाऱ्यांनीही सदावर्तेंना पैसे दिल्याचा दावाही केला होता. तर सदावर्ते हे पोलिसांना तपासात सहकार्य करत नाहीत. ते त्यांचा मोबाईलही देत नाही, असेही प्रदीप घरत यांनी कोर्टात सांगितले आहे. तर पवारांच्या घराबाहेरील आंदोलनाप्रकरणी गुणरत्न सदावर्तेंना उद्या कोर्टात हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर इतर आरोपींची कोठडीही कोर्टाने वाढवली आहे.

Amravati | अचलपूर दंगल प्रकरणी अनिल बोंडेंना पोलिसांनी ताब्यात घ्यावे, काँग्रेस प्रवक्ते दिलीप एडतकरांची मागणी

Gunratna Sadavate : गुणरत्न सदावर्तेंच्या घरी थेट पैसे मोजण्याची मशीन! सरकारी वकिलांचा दावा; लाखो रुपयांची मालमत्ता खरेदी कुणाच्या पैशातून?

Video Dilip Walse Patil | राज्यातील काही संघटना दंगली घटविण्याच्या प्रयत्नात, पोलिसांना अलर्ट राहण्याच्या सूचना

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.