अर्धी राष्ट्रवादी ‘देवेंद्रवासी’, केंद्रीय मंत्रिमंडळातही मोठे फेरबदल, ‘हे’ तीन मोठे नेते थेट दिल्लीत जाणार?

महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कारभाराला कंटाळून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 40 आमदारांनी उठाव केला. एकनाथ शिंदे यांनी भाजपला साथ देत मुख्यमंत्रीपदाचाही शपथ घेतली.

अर्धी राष्ट्रवादी 'देवेंद्रवासी', केंद्रीय मंत्रिमंडळातही मोठे फेरबदल, 'हे' तीन मोठे नेते थेट दिल्लीत जाणार?
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Jul 02, 2023 | 4:06 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा राज्यात मोठा राजकीय भूकंप घडवून आणला आहे. त्यांच्यासोबत आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राज्यात हा मोठा भूकंप झाल्यानंतर त्याचे पडसाद दिल्लीतही उमटणार आहेत. राज्याप्रमाणे केंद्रातही लवकरच मोठा भूकंप होणार असून केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यातील तीन मोठ्या नेत्यांचा समावेश होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कारभाराला कंटाळून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 40 आमदारांनी उठाव केला. एकनाथ शिंदे यांनी भाजपला साथ देत मुख्यमंत्रीपदाचाही शपथ घेतली. तर, ज्या अजित पवार यांच्यामुळे एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडली तेच आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात सामील झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

अर्धी राष्ट्रवादी देवेंद्रवासी

काल बुलडाणा येथे समृद्धी महामागार्वर खाजगी वाहनाचाच अपघात झाल्यावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना जो अपघातात मृत्यू पावतो तो ‘देवेंद्र’वासी होतो अशी टीका केली होती. मात्र, आज अजित पवार यांनी सत्तेत सामील होताच अर्धी राष्ट्रवादी देवेंद्रवासी झाल्याचा टोला भाजप नेत्यांनी लगावला आहे.

येत्या आठवड्यात केंद्राचा विस्तार?

अजित पवार यांच्या समवेत आजच्या शपथविधीला राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवार यांचे कट्टर समर्थक प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. तर खासदार सुनील तटकरे यांची मुलगी अदिती तटकरे यांनीही मंत्रपदाची शपथ घेतली आहे. राज्यात हा बदल झाल्यानंतर केंद्रातही मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा समावेश होण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनि दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत वर्णी?

भाजपचे राज्यातील हेवीवेट नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात पुन्हा एकदा चमत्कार करून दाखविला आहे. पहाटेचा शपथविधी, शिवसेना फोडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देणे आणि आज अजित पवार यांना सत्तेत आणण्याची कामगिरी देवेंद्र फडणवीस यांनी केली. विरोधी पक्षाला चितपट केल्यानंतर फडणवीस यांनी अन्य राज्यातही मुसंडी मारत पक्षाला बळकटी आणण्याचे काम केले. त्यांच्या या कामगिरीची दखल घेऊनच फडणवीस यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्याचा विचार भाजप नेतृत्वाने केल्याची माहितीही या सूत्रांनी दिली आहे.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.