भाजपने थांबवण्याचा प्रयत्न केला नाही का? शरद पवार गटात प्रवेश करण्यापूर्वी हर्षवर्धन पाटलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि त्यांची कन्या अंकिता पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. आता हर्षवर्धन पाटील यांनी पक्षप्रवेशापूर्वी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपने थांबवण्याचा प्रयत्न केला नाही का? शरद पवार गटात प्रवेश करण्यापूर्वी हर्षवर्धन पाटलांचा मोठा खुलासा, म्हणाले...
हर्षवर्धन पाटील, शरद पवार, देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Oct 07, 2024 | 10:31 AM

Harshvardhan Patil Will Join Sharad Pawar Party : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यातच आता अनेक बड्या नेत्यांचे इनकमिंग-आऊटगोईंग सुरु आहे. इंदापुरातील माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार आहेत. इंदापूरमध्ये आज शरद पवार गटाची सभा आयोजित करण्यात आली आहे. याच सभेत भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि त्यांची कन्या अंकिता पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. आता हर्षवर्धन पाटील यांनी पक्षप्रवेशापूर्वी प्रतिक्रिया दिली आहे.

हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश करण्यापूर्वी ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी “माझ्यासमोर उद्या येणाऱ्या निवडणुकांचे टार्गेट आहे. पक्ष जी जबाबदारी देईल ती मी निश्चित पार पाडेन”, असे वक्तव्य केले.

विकासासाठी मी पवारांना साथ द्यायचा निर्णय घेतला

“माझ्यासोबत अनेक पदाधिकारी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. आज हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी शरद पवार गटात प्रवेश करतील. मी याबद्दल देवेंद्र फडणवीसांशीही चर्चा केली आहे. मी इथून लढलं पाहिजे, असा जनतेचा आग्रह आहे. या मतदारसघांत आमच्या विचाराचे अनेक लोकप्रतिनिधी आहेत. गेल्या निवडणुकीत मी अगदी १००० ते १५०० मतांनी पडलो. जर ही मतं पडली असती, तर निकाल वेगळा लागला असता. पण आता हे होऊन गेले आहे. त्यामुळे लोकांनी मला हा निर्णय घ्या असा आग्रह केला आहे. जनता श्रेष्ठ आहे. त्यामुळे जनतेच्या आग्रहाखातर आणि इंदापूरच्या सर्वांगीण विकासासाठी मी पवारांना साथ द्यायचा निर्णय घेतला आहे”, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.

मला कोणत्याही प्रतिक्रियेवर उत्तर द्यायचं नाही

“मी घेतलेला निर्णय हा माझ्या तालुक्यापुरता मर्यादित आहे. मी काही मोठा राष्ट्रीय नेता नाही. त्यामुळे तालुक्यातील लोक म्हणतात, त्यानुसार मी निर्णय घेतलेला आहे. लोकशाहीत जनतेला महत्त्व आहे. यावेळी त्यांना तुम्हाला भाजपने थांबवण्याचा प्रयत्न केला नाही का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी मला कोणत्याही विषयावर भाष्य करायचे नाही. माझ्यासमोर उद्या येणाऱ्या निवडणुकांचे टार्गेट आहे. पक्ष जी जबाबदारी देईल ती मी निश्चित पार पाडेन. इंदापुरातून महाविकासाआघाडीतून लढायचं की नाही हा निर्णय पक्षातील ज्येष्ठ नेते घेतील. सध्या मला कोणत्याही प्रतिक्रियेवर उत्तरं द्यायच नाही”, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

'लाडक्या बहिणींना डायरेक्ट माल...', गुलाबराव पाटील नेमंक काय म्हणाले?
'लाडक्या बहिणींना डायरेक्ट माल...', गुलाबराव पाटील नेमंक काय म्हणाले?.
महाराष्ट्रात राजकीय भूकंप? नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य, रोख दादांकडेच?
महाराष्ट्रात राजकीय भूकंप? नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य, रोख दादांकडेच?.
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.