भाजपला मोठा धक्का; दोन बडे नेते शरद पवारांच्या संपर्कात, माजी मंत्र्याचाही समावेश

BJP 2 Leaders In Contact with NCP Sharad Pawar Group : आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातले भाजपचे दोन बडे नेते शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. कोण आहेत हे नेते? वाचा सविस्तर बातमी...

भाजपला मोठा धक्का; दोन बडे नेते शरद पवारांच्या संपर्कात, माजी मंत्र्याचाही समावेश
शरद पवारImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Aug 21, 2024 | 10:32 AM

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीआधी भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपचे दोन बडे नेते शरद पवारांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. पश्चिम महाराष्ट्रातील दोन बडे नेते शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. कोल्हापूरचे भाजपचे नेते समरजित घाटगे हे शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत. समरजीत घाटगे यांचा शरद पवार गटात प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे. तर पुणे जिल्ह्यातील इंदापूरचे भाजप नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे देखील शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

अजित पवार कोल्हापुरात असताना त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांची कागलमधून उमेदवारी जाहीर केली. समरजित घाटगे इथून लढण्यास इच्छुक होते. मात्र महायुतीत ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे समरजित घाटगे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पर्याय निवडल्याचं समजतंय. तर इंदापूरमध्येही विधानसभेला राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दत्तात्रय भरणे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे शरद पवात प्रवेश करून निवडणूक लढवतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

समरजीत घाटगेंचा पवार गटात प्रवेश जवळपास निश्चित

उद्या होणाऱ्या महायुतीच्या जाहीर सभेला देखील समरजित घाटगे उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे. समरजीत घाटगे यांचा शरद पवार गटात प्रवेश जवळपास निश्चित असल्याचं बोललं जात आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात शरद पवार यांच्या उपस्थितीतच प्रवेश होणार असल्याची खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात उमेदवार देण्यासाठी शरद पवारांनी ही रणनिती आखल्याचं बोललं जात आहे.

हर्षवर्धन पाटील शरद पवार गटाच्या संपर्कात

भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना शरद पवार गटाकडून संपर्क केला गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. इंदापूर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी देण्यासाठी शरद पवार गटाकडून चाचपणी सुरु असल्याची माहिती आहे. हर्षवर्धन पाटील यांची मात्र वेट आणि वॉचची भूमिका असल्याचं कळतं आहे. महायुतीत इंदापूरची जागा अजित पवार गटाला जाण्याची शक्यता आहे. महायुतीकडून हर्षवर्धन पाटील यांना अद्याप शब्द देण्यात आला नाही. गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटलांचे गावभेट दौरे सुरु आहेत. आज वाढदिवसानिमित्त हर्षवर्धन पाटील इंदापूर मतदारसंघात शक्तीप्रदर्शन करणार आहेत.

काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.