धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का ? राष्ट्रवादी अजित पवार गटातील आतली बातमी समोर

संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वातावरण चांगलंच तापलं असून, धनंजय मुंडे यांनी देखील राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे, यावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाची प्रतिक्रिया समोर आली आहे.

धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का ? राष्ट्रवादी अजित पवार गटातील आतली बातमी समोर
Dhananjay MundeImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Dec 28, 2024 | 3:36 PM

काही दिवसांपूर्वी बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली, या प्रकरणातील काही आरोपींना अटक करण्यात आली आहे, मात्र अजूनही काही आरोपी फरार आहेत. त्यामुळे आता वातावरण चांगलंच तापलं असून, आज या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी बीडमध्ये सर्वपक्षीयांकडून आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. त्यापूर्वी रेणापूरमध्ये देखील आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता, या मोर्चात देखील धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती.

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आता राष्ट्रवादी अजित पवार गटातून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर प्रतिक्रिया दिली आहे. राज्याला सक्षम मुख्यमंत्री, गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस मिळाले आहेत. राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्न नाही, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्याला येत्या 26 जानेवारीपर्यंत नवा  पालकमंत्री मिळेल असंही हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

बीडमध्ये वातावरण तापलं

संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता 19 दिवस उलटून गेले आहेत, मात्र अजूनही सर्व आरोपींना अटक झालेली नाहीये. त्यामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. आज बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील आरोपीला अटक करण्यात यावी या मागणीसाठी सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते. यामध्ये आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार बजरंग सोनवणे, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. या मोर्चामध्ये बोलताना नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली. वाल्मिकी कराड यांना अटक करावी, जोपर्यंत या प्रकरणात संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.