Hasan Mushrif: ओवैसी औरंगजेबाच्या कबरीवर येण्यामागे दंगलीचा डाव असावा; हसन मुश्रीफ यांची शंका

Hasan Mushrif: ज्या पद्धतीने प्रसारमाध्यमात जाहिराती येत आहेत, ते पाहता आजची सभा ऐतिहासिक होईल अस वाटतंय, असं मुश्रीफ म्हणाले.

Hasan Mushrif: ओवैसी औरंगजेबाच्या कबरीवर येण्यामागे दंगलीचा डाव असावा; हसन मुश्रीफ यांची शंका
हसन मुश्रीफ Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 14, 2022 | 4:06 PM

कोल्हापूर: एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी (akbaruddin owaisi) औरंगाबादला येऊन गेले. या दौऱ्यात त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊ माथा टेकला. त्यावरून राजकीय वातावरण तापलेलं आहे. आता या वादात ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी उडी घेत शंका उपस्थित केली आहे. अकबरुद्दीन ओवेसींनी राज्यात येऊन औरंगजेबाच्या (aurangzeb) कबरीवर येण्याची गरज नव्हती. तिथं कोणीही जात सुद्धा नाही. अनेक प्रयत्न करून सुद्धा राज्यात काही होत नाही म्हणून हा एक प्रयत्न असावा. इथं येण्यामाग जातीय दंगली घडवण्याचा डाव असावा, अशी शंका हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या मावळ्यांना घेऊन स्वराज्य स्थापन केलं. ओवैसींनी आमचा अपमान करण्याची गरज नव्हती. औरंगजेबाच्या कबरीवर इतके वर्ष का आले नाहीत? एखाद्या व्यक्तीला देशात कुठेही जाता येता येतं. पण असा वाद होणार असेल तर यापुढच्या काळात सरकार याबाबत निश्चित विचार करेल, असंही मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं.

हसन मुश्रीफ यांनी मीडियाशी संवाद साधताना ही शंका उपस्थित केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आज होणाऱ्या सभेवरही भाष्य केलं. ज्या पद्धतीने प्रसारमाध्यमात जाहिराती येत आहेत, ते पाहता आजची सभा ऐतिहासिक होईल अस वाटतंय, असं मुश्रीफ म्हणाले.

हे सुद्धा वाचा

त्या कृत्याची प्रचंड चीड

दरम्यान, शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनीही अकबरुद्दीन ओवैसींवर टीका केली. अकबरूद्दीन ओवैसींच्या कृत्याची आम्हाला प्रचंड चीड आहे. औरंगजेब हे आमच्यासाठी क्रुरकर्माचं नाव आहे. औरंगजेबाची पूजा करणारे लोक या देशातील असूच शकत नाही, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.

दंगे घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे

ओवैसींवर शिवसेना कारवाई का करत नाही? असा सवाल सावंत यांना करण्यात आला. राज्य अशांत करण्याचं तुम्ही कंत्राट घेतलं आहे. तेच तर दुःख आहे. काही करून महाराष्ट्रात दंगे व्हावेत हा प्रयत्न सुरू आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मुख्यमंत्र्यांची सभा

दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. आज संध्याकाळी 7 वाजता बीकेसी मैदानावर उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेची संपूर्ण तयारी झाली आहे. त्यामुळे या सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.