ते नऊ लोकसभा मतदारसंघ, जिथे स्वाभिमानीला जिंकण्याचा विश्वास
मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीच्या चर्चेचं गुऱ्हाळ अजून सुरुच आहे. चार जागांवर आघाडीची चर्चा सुरु आहे. तर त्यातच आघाडीत येण्यासाठी इच्छुक असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आघाडीत न जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी हे त्यांच्या स्वतःसह नऊ जागांवर उमेदवार देणार असल्याचं निश्चित मानलं जातंय. जागावाटपावरुन आघाडीची चर्चा थांबल्याची माहिती आहे. […]
मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीच्या चर्चेचं गुऱ्हाळ अजून सुरुच आहे. चार जागांवर आघाडीची चर्चा सुरु आहे. तर त्यातच आघाडीत येण्यासाठी इच्छुक असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आघाडीत न जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी हे त्यांच्या स्वतःसह नऊ जागांवर उमेदवार देणार असल्याचं निश्चित मानलं जातंय.
जागावाटपावरुन आघाडीची चर्चा थांबल्याची माहिती आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना हातकणंगले, कोल्हापूर, माढा, सांगली, वर्धा, बुलडाणा, शिर्डी, परभणी आणि औरंगाबादमध्ये उमेदवार देण्याची शक्यता आहे. एकीकडे भारिपचे प्रकाश आंबेडकर 12 जागांवर अडून आहेत. तर स्वाभिमीनीचीही काही ठराविक जागांची मागणी आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.
या नऊ मतदारसंघांमध्ये स्वाभिमानीची तयारी (बातमी वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा)