संजय राऊत यांच्या विरोधातील ईडीने दाखल केलेल्या याचिकेबाबत काय झालं? सुनावणी न होण्यामागील कारण काय?
ईडीने यापूर्वी दोन ते तीन वेळेस संजय राऊत यांचा जामीन रद्द व्हावा याकरिता उच्च न्यायालयातील खंडपीठासमोर सुनावणी व्हावी यासाठी प्रयत्न केले होते.
मुंबई : पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा आरोप असलेले संजय राऊत हे जामीनावर बाहेर आहे. त्यांचा जामीन रद्द करावा यासाठी ईडीने अर्थात सक्तवसुली संचलनालयाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणी घेण्यास स्पष्ट नकार दिला होता. आज पुन्हा त्यावर सुनावणी व्हावी यासाठी सक्तवसुली संचलनालयाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी ईडीच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला होता. चार न्यायमूर्ती यांच्या समोर संजय राऊत यांचा जामीन रद्द करावा यासाठी सुनावणी होणार होती तिला नकार दिला आहे. त्यामुळे दुसऱ्यांदाही ही सुनावणी लांबणीवर पडली आहे. पत्राचाळ आर्थिक व्यवहाराचे आरोप असलेल्या संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती. जवळपास 100 दिवस संजय राऊत हे ईडीच्या कोठडीत होते. 9 नोव्हेंबर 2022 ला पीएमएलए न्यायालयाने संजय राऊत यांना जामीन मंजूर केला होता.
चार खंडापुढे आज संजय राऊत यांना मिळालेला जामीन रद्द व्हावा यासाठी ईडीने दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयात आज सुनावणी होती.
मात्र, आज दुसऱ्यांदा मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. संजय राऊत यांचा जामीन रद्द होण्यासाठी ईडीकडून प्रयत्न केला जात असल्याने एकप्रकारे त्याला खीळ बसत आहे.
आताही न्यायमूर्ती नितीन भोरसर यांच्या खंडपीठासमोर ईडीने ही सुनावणी घेण्याची मागणी केली होती. मात्र, ते अनुपस्थित असल्याने ही सुनावणी होणार नाहीये.
ईडीने यापूर्वी दोन ते तीन वेळेस संजय राऊत यांचा जामीन रद्द व्हावा याकरिता उच्च न्यायालयातील खंडपीठासमोर सुनावणी व्हावी यासाठी प्रयत्न केले होते.
आज पुन्हा ही सुनावणी होणार नसल्याने संजय राऊत यांना एकप्रकारे हा दिलासा मानला जात असून पुढील काळात सुनावणी होणार का? ईडीकडून काय प्रयत्न केले जातात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.