Rajapur Corona Free | राजापूर तालुका कोरोनामुक्त, 8 जानेवारीला आढळलेला शेवटचा रुग्ण
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुका राज्यातील कोरोनामुक्त झाल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. Rajapur is first corona free taluka
रत्नागिरी: कोरोना विषाणूचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला. कोरोनाच्या संकटातून महाराष्ट्र उभारी घेत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून महाराष्ट्रासाठी चांगली बातमी आहे. राजापूर तालुका राज्यातील पहिला कोरोनामुक्त तालुका ठरला आहे. राजापूर तालुक्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे. ( Health Department claimed Rajapur is first corona free taluka in Maharashtra)
राजापूरवासियांसाठी आनंदाची बातमी
राजापूर तालुका हा कोरोनामुक्त झाला असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. गेल्या 9 महिन्यात राजापूर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या 373 वर जावून पोहचली होती. यापैकी 356 जण कोरोनामुक्त झाले तर 19 कोरोनामुळं मृत्यू झाला.
8 जानेवारीला शेवटचा रुग्ण आढळला
सध्या राजापूर तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण नसल्याची माहिती आरोग्य विभागानं दिलीय.8 जानेवारीला राजापूर तालुक्याील शेवटचा कोरोना रुग्ण आढळला होता. तो बरा होवून घरी गेल्यानंतर मात्र कोरोनाचे रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे राजापूर तालुका कोरोनामुक्त झालाय.
केंद्र शासनाच्या निर्णयानुसार कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. राजापूर तालुक्यात जवळपास 164 जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. सध्या तालुक्यात एकही कोरोना रुग्ण नसल्यामुळे प्रशासनानं कोरोना लसीकरणावर लक्ष केंद्रीत केले आहे. मात्र, कोरोनाचा धोका कायम असल्याने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आणि मास्क वापरावा, असं आवाहन प्रशासनानं केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात झालीय. मात्र, ही लस घेण्यास आरोग्य कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद कमी पाहायला मिळतोय. 16 जानेवारीला लसीकरण सुरु झालेय पण रत्नागिरी जिल्ह्यातील पाच लसीकरण केंद्रावर फक्त 49 टक्केच प्रतिसाद मिळालाय. पाच केंद्रावर 500 जणांना लस दिली जाणार होती. 21 जानेवारीपर्यंत त्यापैकी 245 जणांनी हि लस टोचून घेतलीय. गुहागरच्या लसीकरण केंद्रावर 79, कामथे इथल्या लसीकरण केंद्रावर 62, राजापूरच्या लसीकरण केंद्रावर 49 , दापोलीतल्या लसीकरण केंद्रावर 32 तर रत्नागिरीच्या लसीकरण केंद्रावर सर्वात कमी म्हणजे 23 जणांनी लस घेतलीय. या प्रत्येक केंद्रावर १०० जणांना लस दिली जाणार होती.
राज्यात आज 2779 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 3419 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1906827 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 44926 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.17% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) January 22, 2021
राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 1906827 झाली आहे राज्यात एकूण 44926 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.17% झाले आहे.
संबंधित बातम्या:
कोरोनाच्या लशीबाबात भीती बाळगू नका; केंद्र सरकारनं परवानगी दिली मी आत्ता लगेच लस घेईन: राजेश टोपे
कोव्हॅक्सीन लसीविषयी धास्ती; जे.जे. रुग्णालयात दिवसभरात 100 पैकी केवळ 13 जण लसीकरणास हजर
(Health Department claimed Rajapur is first corona free taluka in Maharashtra)