मुंबई : राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मास्कसक्ती (Mask Compulsory) करण्यात आल्याची चर्चा होत आहे. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी स्पष्टीकरणं दिलं आहे. “इंग्लिशमध्ये मस्ट वापरल्यामुळे सक्तीचा असा अर्थ काढला जातोय. पण सध्या सक्ती नाही तर मास्क वापरण्याचं आवाहन आम्ही जनतेला करत आहोत. ही सक्ती नाही”, असं टोपे म्हणाले आहेत.
राज्यात मास्क वापरण्यावरून संभ्रम आहे. त्यावर राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “सध्या राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेणं, काळजी घेणं गरजेचं आहे. आम्ही राज्यातील जनतेला आवाहन करत आहोत की सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरावा, पण ही सक्ती किंवा बंधन नाही तर स्वेच्छेने आपल्या आरोग्यासाठी घ्यावयाची काळजी आहे. इंग्लिशमध्ये मस्ट वापरल्यामुळे सक्तीचा असा अर्थ काढला जातोय. पण सध्या सक्ती नाही तर मास्क वापरण्याचं आवाहन आम्ही जनतेला करत आहोत. ही सक्ती नाही”, असं राजेश टोपे म्हणाले आहेत.
1 सार्वजनिक वाहतुकीची ठिकाणं
2 शाळा
3. कॉलेज
4. बंदीस्त सभागृह
5. गर्दीची ठिकाणं
6.रेल्वे
7. बस
8. सिनेमागृहे
9. रुग्णालये
10. हॉटेल
आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्राच्या माध्यामातून राज्यातील कोरोना स्थितीवर भाष्य केलंय. राज्यातील 6 जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.या जिल्ह्यात लसीकरण वाढवण्यावर भर द्यावा, असा सल्ला देण्यात आला आहे. पुण्यात नुकताच कोरोनाचा नवा व्हेरिएंटही सापडला आहे, त्याकडेही लक्ष देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
1. मुंबई
2. मुंबई उपनगर
3.ठाणे
4. पुणे
5. रायगड
6. पालघर