Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘राज्यात व्हेंटिलेटरची संख्या मुबलक, मात्र हाताळणारे कमी’, आरोग्य मंत्र्यांची आरोग्य कर्मचारी तुटवड्यावर कबुली

राज्यात व्हेंटिलेटरची कमतरता नसून त्यांना हाताळण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याचंही राजेश टोपे यांनी मान्य केलंय.

'राज्यात व्हेंटिलेटरची संख्या मुबलक, मात्र हाताळणारे कमी', आरोग्य मंत्र्यांची आरोग्य कर्मचारी तुटवड्यावर कबुली
राजेश टोपे, आरोग्यमंत्री
Follow us
| Updated on: Apr 05, 2021 | 10:27 PM

धुळे : राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आगामी काळात रेमडेसिविर इंजेक्शन मुबलक प्रमाणात उपलब्ध करुन देणार असल्याची घोषणा केलीय. ते आज (5 एप्रिल) धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी जिल्ह्याच्या कोराना परिस्थितीचा आढावा घेतला. “राज्यात व्हेंटिलेटरची कमतरता नसून त्यांना हाताळण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याचंही राजेश टोपे यांनी मान्य केलं. लवकरच हे मनुष्यबळ उपलब्ध करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं (Health Minister Rajesh Tope on Corona Shortage of Doctors and medicines).

राजेश टोपे म्हणाले, “नागरिक खासगी हॉस्पिटलपेक्षा सरकारी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे प्रमाण जास्त आहे. नागरिकांनी अंगावर दुखणं न काढता वेळीच उपचार घ्यावेत. राज्यात लसीकरणाचेही प्रमाण वाढविणार आहे. नागरिकांनी सरकारने दिलेल्या सूचनाचे पालन करावे.” यावेळी त्यांनी राज्याच्या विरोधी पक्षनेत्यानी कोरोना काळात सरकारला सहकार्य करण्याच्या भूमिकेचंही स्वागत केलं.

पत्रकारांच्या विम्याबाबत बोलण्यास राजेश टोपेंची टाळाटाळ

जिल्हाधिकाऱ्यांना कोरोनाच्या काळात सतत रस्त्यावर असणाऱ्या पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर म्हणून लसीकरण देण्याच्या सूचना केल्याची माहितीही राजेश टोपे यांनी दिली. मात्र, पत्रकारांच्या विम्याबाबत बोलण्याचं त्यांनी टाळलं. बाधित रुग्णाच्या संपर्कात असणाऱ्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्या तपासण्या करून त्यांच्यावर योग्य ते उपचार केल्यास जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणात येईल, असंही टोपेंनी सांगितलं.

‘धुळ्यात आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा’

धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहात आरोग्य मंत्री राजेश टोपे आले असता त्या ठिकाणी कार्यकर्त्यांसह असंख्य नागरिकांनी गर्दी केली. त्यामुळे आरोग्य मंत्र्यांच्या उपस्थितीतच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा पुरता फज्जा उडालेला पाहायला मिळाला.

ऑक्सिजन व रेमेडिसीव्हरबाबत संपर्क साधा

मेडिकल ऑक्सिजन व रेमेडिसीव्हर इंजेक्शन या औषधांचा पुरवठा सुरळीतपणे होत राहणे आवश्यक असल्याने अन्न व औषध प्रशासनाकडून मेडिकल ऑक्सिजनच्या अखंडित पुरवठ्यासाठी जिल्ह्यातील मेडिकल ऑक्सिजन उत्पादक, पुरवठाधारक, जिल्हा रूग्णालय व खासगी रूग्णालयांशी समन्वय ठेवण्यात येत असून मेडिकल ऑक्सिजन व रेमडेसीवीर इंजेक्शनच्या उपलब्धतेबाबत काही अडचण असल्यास सहायक आयुक्त (औषधे), अन्न व औषध प्रशासन (म. राज्य), जालना यांचेशी 9764177758 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सद्यस्थितीत जालना जिल्हयात ऐसेम गॅसेस प्रा.लि. व एम. एस. ऑक्सिजन हे दोन उत्पादक तथा पुरवठादार आहेत. त्या व्यतिरिक्त राज इंन्टरप्राईजेस संभाजी नगर जालना, योगीराज ट्रेडर्स, भोकरदन नाका, जालना हे दोन पुरवठादार आहेत. तसेच जिल्ह्यात रेमेडिसीव्हर इंजेक्शन कोविड रूग्णालय संलग्न मेडीकलमध्ये उपलब्ध असून भोकरदन नाका येथील प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र येथेही उपलब्ध आहे.

हेही वाचा :

जालन्यात कोरोना रोखण्यासाठी पाचसूत्री कार्यक्रम; आरोग्य मंत्र्यांनी दिले ‘हे’ आदेश

Corona Update : कोरोनाचा सामना करण्यासाठी 5 हजार वैद्यकीय अधिकारी, 15 हजार नर्सेस देणार, अमित देशमुखांची ग्वाही

Maharashtra second Lockdown : महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यात निर्बंध लागणार, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

व्हिडीओ पाहा :

Health Minister Rajesh Tope on Corona Shortage of Doctors and medicines

महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.