कोरोनाचं निदान 5 मिनिटात, रॅपिड टेस्टला मान्यता : राजेश टोपे

ब्लड घेतल्यावर केवळ 5 मिनिटात कोरोना आहे की नाही असे समजणारी ही रॅपिड टेस्ट आहे," असे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh tope On Corona) यावेळी म्हणाले.

कोरोनाचं निदान 5 मिनिटात, रॅपिड टेस्टला मान्यता : राजेश टोपे
Follow us
| Updated on: Apr 02, 2020 | 3:42 PM

मुंबई : राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढताना दिसत (Health Minister Rajesh tope On Corona) आहे. “राज्यात 5 हजार चाचणींची क्षमता आहे. आपल्याला रॅपीड टेस्टची मान्यात मिळालेली आहे. त्यामुळे प्राथमिक चाचणीतच प्रादूर्भाव आहे का ते कळेल. तसेच ब्लड घेतल्यावर केवळ 5 मिनिटात कोरोना आहे की नाही असे समजणारी ही रॅपिड टेस्ट आहे,” असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यावेळी म्हणाले.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील सर्व राज्याच्या (Health Minister Rajesh tope On Corona) मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि गृहमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे चर्चा केली. यावेळी त्यांनी सर्व राज्यांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सर्व राज्याच्या मंत्र्यांना मार्गदर्शन केलं

“मोदींनी दिलेल्या सूचनांची अंमलवजावणी आपण महाराष्ट्रात आता तर करतो आहोत, पण पुढे आणखीन चांगल्याप्रकारे करणार आहोत. त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा विशेष म्हणजे टेस्टिंगचा. दर दिवसाला पाच हजार टेस्ट होऊ शकतात एवढी क्षमता राज्यभराची आहे. आपल्याला रॅपीड टेस्टची मान्यात मिळालेली आहे. त्यामुळे प्राथमिक चाचणीतच प्रादूर्भाव आहे का ते कळेल,” असे राजेश टोपे म्हणाले.

रॅपीड टेस्टचा म्हणजे काय?

“रॅपीड टेस्टचा अर्थ असा आहे की, ब्लड घेतल्यावर पाच मिनिटात आपल्या शरीरात अॅन्टीबॉडीज तयार झालेले आहेत का त्याच्या प्रमाणावरुन संबंधित व्यक्तीला इन्फेक्शन आहे का ते समजणार आहे. यावरुन लोकांच्या संख्येचे प्रमाण कळलं तर त्याला लगेच क्वारंटाईन किंवा आयसोलेट करता येईल आणि त्यांच्यावर उपचार करता येईल,” असेही आरोग्यमंत्री यावेळी म्हणाले.

“युद्धापेक्षाही मोठी समस्या आहे. सर्वांनी टीमवर्कने एकत्र येऊन सामोरं जायला पाहिजे,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

“त्याशिवाय त्यांनी सर्व्हेलंस म्हणजे ट्रेसिंग तपासणी करणं यावरही जोर दिला. आपण जे थ्री टी प्रिसिंपल म्हणतो त्यामध्ये ट्रेसिंग, ट्रकिंग करणं, टेस्टिंग करणं आणि ट्रिटमेंट करणे, याचा समावेश आहे. यामध्ये ट्रेसिंग करण्याचा जो भाग आहे त्यावर अधिक भर देण्यासंदर्भात त्यांनी सांगितलं आहे. यामध्ये सर्व्हेलंस जो करायचा आहे ते म्हणजे जो पॉझिटिव्ह सापडला आहे त्याला क्वारंटाईन करायचं आहे,” असेही राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले.

“त्यासाठी गरज पडली तर त्याचे कंटेनमेट झोन आपण जो हॉटस्पॉट म्हणतो, अशा ठिकाणी चांगल्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामध्ये ड्रोन टेक्नॉजी किंवा डिजीटल माध्यमातून मोबाईल फोन किंवा जीपीएस बॅन्डसुद्धा बांधला तरी ज्या लोकांना क्वारंटाईन केलं आहे त्यांच्या लोकेशनची माहिती मिळेल. त्यांनी जनमानसात फिरु नये यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करा, असं मोदींनी सांगितलं,” अशीही माहिती राजेश टोपे यांनी दिली.

“ट्रिटमेंटच्या अनुषंगाने आपण महाराष्ट्रात डेडीकेटेड हॉस्पिटल प्रत्येक जिल्हा्यात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याअगोदरच हा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक जिल्ह्यात एक्स्क्लुझिव्ह कोव्हीड 19 रुग्णालये म्हणून नेमली आहेत. फक्त कोरोनाबाधित रुग्णांसाठीच ते हॉस्पिटल असणार आहेत. अशा स्वरुपाचे हॉस्पिटल असावेत असा आग्रहच केंद्र सरकारने केला आहे. त्या दृष्टीकोनाने आपल्या राज्याची तयारी आहे,” असेही राजेश टोपे यांनी यावेळी सांगिले.

“जिथे जास्त संख्या आहेत तिथे खूप स्ट्रिक्ट कर्फ्यू किंवा सोशल डिस्टन्सिंगचं पालन व्हायला हवं,” असेही काही सल्लेही पंतप्रधान मोदींनी दिले.

“देशात युद्धापेक्षा गंभीर परिस्थिती आहे. सर्वांनी टीमवर्कने एकत्र येऊन सामोरं जायला पाहिजे, अशी अपेक्षा पंतप्रधान मोंदींनी व्यक्त केली आहे. तशाचप्रकारे  तयारीही करावी अशा सूचना पंतप्रधानांनी सर्वांना दिल्या.”

“सोशल डिस्टन्सिंगमध्ये तडजोड नाही. मुंबईतील 146 ठिकाणी काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. हॉटस्पॉट आहेत तिथे कलम 144 लागू केले आहे. तसेच अनेक ठिकाणी जमावबंदी लागू करणार आहोत,” असेही आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh tope On Corona) म्हणाले.

Non Stop LIVE Update
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.