बाळासाहेबांच्या नखाची सर सुद्धा उद्धव ठाकरेंना येणार नाही – शिंदे गटाच्या नेत्याचा टोला

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. राज ठाकरे आणि रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांना गद्दार आणि बाळासाहेबांची शैली नक्कल करणारे म्हटले आहे. शिंदे गटाने उद्धव ठाकरेंवर शिवसेना फोडल्याचा आरोप केला आहे, तर त्यांच्यावर एफआयआर का दाखल होत नाही यावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. महायुतीला १७० जागा मिळतील असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.

बाळासाहेबांच्या नखाची सर सुद्धा उद्धव ठाकरेंना येणार नाही - शिंदे गटाच्या नेत्याचा टोला
Follow us
| Updated on: Nov 19, 2024 | 9:06 AM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतादानासाठी आता अवघे 24 तास उरले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर काल संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. मात्र त्यापूर्वी राज्यभरात प्रचाराचं रणकंदन माजलं. यामध्ये अनेकांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू होते. माहीम मतदारसंघातून निवडणूक लढवणारे मनसेचे अमित ठाकरे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेल्या राज ठाकरे यांनी काल ठाकरे गटाचे प्रमुख नेते उद्धव ठाकरेंवर आरोप करत घणाघाती हल्ला केला. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना गद्दार म्हटलं. एका माणसाने सगळ्या पक्षाची वाट लावली असा आरोप त्यांनी केला. त्यांच्या या विधानानंतर अवघ्या काही वेळातच आणखी एका नेत्याने उद्धव ठाकरेंवर कडाडून टीका केली. उद्धव ठाकरे बाळासाहेबांची स्टाईल मारायला जात आहेत. हातामध्ये रुद्राक्ष बांधताहेत, जणू मी काय बाळासाहेब ठाकरेच आहे.. पण बाळासाहेबांची सर त्यांना येणार नाही अशी टीका शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केली. आपल्या मुलाला मुख्यमंत्री करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी शिवसेना फोडण्याचं पाप केलं असा आरोपही कदम यांनी केला.

उद्धव ठाकरे यांचं पितळ उघडं पडेल

खेड रत्नागिरीमध्ये बोलताना रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं. शिवसेना ठाकरे गटाच्या या प्रमुख नेत्यावर त्यांनी कडाडून टीका केली. ‘ या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांचं पितळ उघडं पडेल. कालपर्यंत त्यांनी वाघाचं चामडं घातलंय असा अविर्भाव होता ते आता उघड पडलंय अशी टीका कदम यांनी केली. या निवडणुकीत महायुतीच्या ( शिवसेना भाजप राष्ट्रवादी) किमाना 170 जागा येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

उद्धव ठाकरेंवर एफआयआर का दाखल होत नाही ?

उद्धव ठाकरे यांचा तोल इतका खाली गेला आहे की ते मुख्यमंत्री, पंतप्रधान यांना काहीही बोलतात. नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत एक वक्तव्य केलं होतं – मी असतो तर कानफडीत मारली असती. त्यांना जेवणावरून उचलून आत मध्ये टाकला होतं, मग उद्धव ठाकरेंवर एफ आय आर दाखल का होत नाही ? असा सवाल रामदास कदम यांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरे बाळासाहेबांची स्टाईल मारायचा प्रयत्न करत आहेत. हातामध्ये रुद्राक्ष बांधताहेत, जणू काय मी बाळासाहेब ठाकरे आहे. पण बाळासाहेबांच्या नखाची सर सुद्धा तुला येणार नाही असा टोला कदम यांनी हाणला. आपल्या मुलाला मुख्यमंत्री करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना फोडण्याचा पाप केलंय. उतारवयात मनोहर जोशींना स्टेजवरून भर जाहीर सभेत उतरवायला भाग पाडलं. माझ्या बाबतीतही त्यांनी तसाच प्लॅन केला होता पण मला एकनाथ शिंदेंनी वाचवलं, असं म्हणत कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.