औरंगाबाद : काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्याची मोठी दुर्दशा झाली. या भागात खरीप हंगाम पुरता पाण्यात गेला. अतिवृष्टी झाल्यानंतर विरोधी पक्षाचे नेते तसेच काही मंत्र्यांनी मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अतिवृष्टीमुळे नेमके किती नुकसान झाले याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. त्यांनी मराठवाड्यातील 48 लाख हेक्टर पैकी 35 ते 36 लाख हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याची शक्यता आहे. एनडीआरएफच्या नॉर्मनुसार हे नुकसान 4 हजार कोटी रुपयांचे असावे, असं सांगितलं आहे.
अजित पवार यांनी मराठवाड्यातील अतिवृष्टी तसेच झालेल्या नुकसानीविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच वेळ आली तर कर्ज काढू पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासन दिले. “मराठवाड्यातील 48 लाख हेक्टर क्षैत्रापैकी 35 ते 36 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाल्याची शक्यता आहे. एनडीआरएफच्या नॉर्मनुसार हे नुकसान 4 हजार कोटी रुपयांचे झाले असावे. पालकमंत्र्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. ओल्या दुष्काळाचा निर्णय मुख्यमंत्री स्तरावर होईल. मी मुख्यमंत्र्यांशी याबाबत बोलणार आहे. वेळप्रसंगी कर्ज काढू. पण मराठवाड्याच्या आणि राज्यातील कुठल्याच शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही,” असे आश्वासन अजित पवार यांनी दिले.
तसेच मराठवाड्यात 32 ते 36 लाख हेक्टरवर नुकसान झाल्याच्या प्राथमिक आकडा येतोय. एनडीआरएफच्या नॉर्मप्रमाणे 4 हजार कोटींचे नुकसान झाल्याचे दिसतेय. बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय. 19 तारखेपर्यंत अजून पावसाचा अंदाज आहे. एनडीआरएफच्या नॉर्मनुसार काम सुरु आहे. मुखमंत्र्यांना सोमवारी याबाबत आम्ही अहवाल देणार आहेत. तसेच नुकसानीविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत, असेदेखील अजित पवार म्हणाले.
तसेच पुढे बोलताना, रस्ते पूल सगळं वाहून गेलं. तलाव फुटले आहेत. नुकसानीचा पूर्ण अंदाज अजून आलेला नाही. मात्र, यंत्रणा काम करत आहे. यापूर्वी पीक विम्याचे पैसे आम्ही सोडलेले आहेत. आता केंद्रानेही पैसे द्यावेत. नुकसान झालेले शेतकरी तसेच इतर घटकांना मदत करण्यासंदर्भात पॅकेज जाहीर करण्याबाबत आम्ही चर्चा करणार आहेत. यावर मुख्यमंत्री स्तरावर निर्णय होईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
तसे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे आता शेतकऱ्यांना पीककर्ज फेडणे शक्य नाही. त्यामुळे कर्जाचे पुनर्गठन करावे लागेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत सविस्तर सांगतील, असेदेखील पवार म्हणाले. तसेच सोमवारच्या महाराष्ट्र बंदला राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे. शेतकऱ्यांना चिरडणे याआधी कधीच घडलं नाही, असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली.
इतर बातम्या :
आयकर विभागानं पवार कुटुंबियांना टार्गेट केलंय का? फडणवीसांची पहिल्यांदाच सविस्तर प्रतिक्रिया
Rain Update | पुण्यात पावसामुळे दाणादाण, सखल भागात पाणी साचलं, आगामी 4 दिवसांत राज्यात मुसळधार