Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रातल्या या जिल्ह्यात मुसळधार पाऊस, पुढील दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट

maharashtra rain news today in marathi : महाराष्ट्रात काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे, तर काही जिल्ह्यात तुरळक पावसाच्या सरी सुरु आहेत. पुढील दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने जाहीर केला आहे.

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रातल्या या जिल्ह्यात मुसळधार पाऊस, पुढील दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट
Maharashtra Rain Alert
Follow us
| Updated on: Aug 03, 2023 | 11:53 AM

महाराष्ट्र : संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर जूलै महिन्यात पावसाला सुरुवात झाली. मान्सून (Maharashtra Rain Update) संपूर्ण राज्यात सक्रीय झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. त्याचबरोबर काही जिल्ह्यात तुरळक प्रमाणात पाऊस झाला. ज्या भागात मुसळधार पाऊस (Maharashtra Rain Alert) झाला आहे. तिथली धरणं भरली आहेत. काही धरण कधीही भरु शकतात अशी स्थिती आहे.त्यामुळे यापुढे मुसळधार पाऊस झाल्यास धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात येणार आहे. यापुर्वी रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. सकाळपासून जिल्ह्यात पाऊस (maharashtra rain news today in marathi) सुरु झाला आहे. खाडीपट्यात पावसाचा जोर अधिक आहे. जूनपासून आत्तापर्यंत पावसाने सव्वा दोन हजार मिलिमीटरची सरासरी ओलांडली आहे.

अकोला जिल्ह्यात गेल्या महिन्यात ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. तर काही ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीची कामे खोळंबली होती. तर आता पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा आपल्या शेतीच्या अंतर्गत मशागतीच्या कामांना सुरुवात केली आहे. फवारणी, खुरपनी, डवरणी यासारख्या कामांना वेग आला आहे. तर शेतातील पिके शेतात मोठ्या थाटात डोलतांना दिसत आहे.

अमरावती जिल्ह्यात पावसाची उसंत मिळाल्यानंतर शेतीच्या मशागतीच्या कामाला वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. अमरावती जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने संपूर्ण शेतीची कामे खोळंबली होती. मात्र आता पावसाने उसंत दिल्यानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा आपल्या शेतीच्या मशागतीच्या कामात गुंतला असल्याचं पाहायला मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

गेल्या पाच सहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणावर पिकामध्ये तण वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त होऊन आर्थिक संकटात सापडला शेतात मोठ्या प्रमाणात तण वाढल्यामुळे पिकांवर परिणाम होत असल्याने आज पावसाच्या विश्रांतीनंतर शेतकरी राजा शेती मशागती कामात व्यस्त असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, तर यामुळे शेतमजुरांच्या हाताला काम मिळालं आहे..

शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण…

गोंदिया जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. मात्र काल सायंकाळपासूनच पावसाची रिप रिप सुरू झाली असून सकाळी सुद्धा ही रिपरिप सध्या कायम आहे. हलक्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या वर्षीय तुलनेत जुलैपर्यंत जिल्ह्यात 125 मिलिमीटर पावसाची तूट आहे मात्र रात्रीपासून येणाऱ्या पावसामुळे ही तूट भरून निघण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.

बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.