Rain : नाशकात पावसाची तुफान बॅटींग, खरिपाला पोषक वातावरण, उर्वरित महाराष्ट्राची प्रतिक्षा कायम..!

रब्बी हंगामातील पिकांची काढणी होताच शेतकऱ्यांनी खरिपासाठी क्षेत्र तयार करण्यास सुरवात केली होती. यातच यंदा मान्सूनचे आगमन वेळेपूर्वी होणार असल्याचा अंदाज वर्तवला गेल्याने शेतकऱ्यांनी शेती मशागतीची कामे उरकून घेतली होती. यातच रविवारी जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे.

Rain : नाशकात पावसाची तुफान बॅटींग, खरिपाला पोषक वातावरण, उर्वरित महाराष्ट्राची प्रतिक्षा कायम..!
नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे. जोगोजागी पाणी साचले होते.
Follow us
| Updated on: Jun 07, 2022 | 10:36 AM

नाशिक : यंदा वेळेपूर्वीच (Monsoon) मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज (Meteorological Department) हवामान विभागाने वर्तवला होता. त्यामुळे शेती मशागतीची कामे आटोपून बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागले असतानाच (Nashik) नाशिक जिल्ह्यात पावसाने तुफान बॅटींग केली आहे. वादळी-वाऱ्यासह झालेल्या पावसामध्ये शेत – शिवारात पाणीच पाणी झाल्याचे चित्र होते. त्यामुळे उशिरा का होईना दणक्यात पाऊस झाल्याने आता खरीप हंगामातील कामांना अधिक वेग येणार आहे. नाशिक जिल्ह्यात देवळा तालुक्यात जागोजागी पाणी साचल्याचे पाहवयास मिळाले असून नाशिककरांना उकाड्यापासूनही दिलासा मिळाला आहे. पावसामध्ये सातत्य राहिल्यास लवकरच खरीप हंगामातील पेरण्यांना सुरवात होणार आहे. पावसामुळे अल्हादायक वातावरण निर्माण झाले आहे.

शेती मशागत होताच पावसाची हजेरी

रब्बी हंगामातील पिकांची काढणी होताच शेतकऱ्यांनी खरिपासाठी क्षेत्र तयार करण्यास सुरवात केली होती. यातच यंदा मान्सूनचे आगमन वेळेपूर्वी होणार असल्याचा अंदाज वर्तवला गेल्याने शेतकऱ्यांनी शेती मशागतीची कामे उरकून घेतली होती. यातच रविवारी जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे मशागत उपयोगी आली असून आता पावासामध्ये सातत्या राहिल्यास शेतकरी चाढ्यावर मूठ ठेवणार यामध्ये शंका नाही.

राज्यात तुरळक ठिकाणीच वरुणराजाची कृपादृष्टी

7 जून उजाडला तरी राज्यात सर्वत्र पाऊस झालेला नाही. मध्यंतरी मराठवाड्यातील लातूर, परभणी, औरंगाबाद जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती. गत आठवड्यात पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, बार्शी या ठिकाणी झालेल्या पावसाने द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, अद्यापही पाऊस हा सक्रीय झालेला नाही. तुरळक ठिकाणीच तो बरसत असून पावसाच्या या लहरीपणामुळे शेतकरीही संभ्रमात आहे. मात्र, उत्तर भारतामध्ये रविवारी पाऊस झाल्याने संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहे.

हे सुद्धा वाचा

खरिपाच्या पेरणीसाठी पोषक वातावरण

यंदा मान्सूनचे वेळेपूर्वीच आगमन होणार असल्याचे सांगण्यात आल्याने शेतकऱ्यांनी शेती मशागतीची कामे वेळेत पूर्ण केली होती. सध्याही पेरणीला उशिर झाला नसला तरी आता पावसाने सर्वदूर हजेरी लावली तर सर्वकाही वेळेत होणार आहे. अन्यथा गतवर्षी सारखे अंतिम टप्प्यात परतीच्या पावसाने हजेरी लावली तर खरिपाते होत्याचे नव्हते होते. त्यामुळे नाशकाप्रमाणे राज्यात सर्वदूर पाऊस झाला तर शेतकरी चाढ्यावर मूठ ठेवण्यास तयार राहणार आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.