Heavy rain : सांगली जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ; जत दुष्काळी भागात पावसामुळे पूल गेला पाण्याखाली
मागील 22 तासापासून सांगली जिल्ह्याला पावसाने झोडपले असून जत दुष्काळी भागातही पावसाने जोर वाढवला आहे. त्यामुळे दुष्काळी भागात लोक समाधान व्यक्त करत आहेत. मात्र पावूस इतका झाला आहे की तेथील पुलावर पाणी आले आहे. तसेच रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे सांगलीसह जतमधील जनजीवन संपूर्णता विस्कळीत झाले आहे.
सांगली : सांगली जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊसाची (Pre-Monsoon Rain) धुंवाधार बॅटिंग सुरू आहे. काल सुरू झालेल्या पाऊस अजूनही थांबलेला नाही. सांगली शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गेले 22 तासापासून मुसळधार पाऊस (Heavy rain) पडत आहे. तसेच जिल्ह्यात पावसाने हजेर लावल्याने दुष्काळी भागातील जत तालुक्याला याचा चांगला दिलासा मिळत आहे. मात्र या पावसाने द्राक्ष बागायतदार यांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पावसाच्या जबरदस्त बॅटिंगचा फटका फक्त द्राक्ष बागायतदार यांनाच बसलेला नाही तर जत तालुक्याला बसला आहे. येथे पावसामुळे पूल गेला पाण्याखाली गेल्याने संपुर्ण जिल्ह्यातील जनजीवन संपूर्णता विस्कळीत झाले आहे. दरम्यान पावसामुळे जिल्ह्यातील नियोजीत कामांना फटका बसला आहे. तर पावसामुळे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना सांगलीचा नियोजित दौरा रद्द करावा लागला आहे.
रस्ता वाहून गेला
मे महिना अजूनही संपलेला नाही. तर देशात यावेळी मान्सुनने लवकर इंट्री केली आहे. तसेच मान्सुनपुर्व पावसाने देखील राज्यात दमदार सुरूवात केली आहे. त्यामुळे गर्मीने हैराण झालेल्या लोकांना दिलासा मिळत आहे. मागील 22 तासापासून सांगली जिल्ह्याला पावसाने झोडपले असून जत दुष्काळी भागातही पावसाने जोर वाढवला आहे. त्यामुळे दुष्काळी भागात लोक समाधान व्यक्त करत आहेत. मात्र पावूस इतका झाला आहे की तेथील पुलावर पाणी आले आहे. तसेच रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे सांगलीसह जतमधील जनजीवन संपूर्णता विस्कळीत झाले आहे.
अनेक भागांचा संपर्क तुटला
जिल्ह्यात काल सायंकाळ पासून पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. त्यामुळे सांगलीसह जतमधील अनेक नाले ओढे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. बिरूळ ते खोजनवाडी रस्ता पाण्याने कातरून गेला आहे. अनेक ठिकाणी पुलावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे अनेक भागांचा संपर्क तुटला आहे. काल सायंकाळी सुरू झालेला पाऊस आज दुपार होत आली तरी पावसाने थांबलेला नाही किंवा उगडीप दिलेली नाही.
जोरदार पावसाचा फटका
सांगली शहरा सह संपूर्ण जिल्ह्यात गेले 22 तासापासून मुसळधार पाऊस पडत असल्याने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना सांगलीचा नियोजित दौरा रद्द करावा लागला आहे. यावेळी त्यांनी, हवामानामुळे आजचा दौरा रद्द होत असल्याने फार दुःख होत असल्याचे म्हटले आहे. या दौऱ्यामुळे मिरजेतील कार्यक्रमात कार्यकर्त्यांसोबत संवाद साधता आला असता पण पुढील कार्यक्रमात नक्की करू असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वैक्त केला आहे. सांगलीत आज विविध कामांचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार होतं. पण पावसामुळे आणि खराब हवामानामुळे आजचा दौरा रद्द झाला आहे.
सोलापुरात मैदानाला तळ्याचे स्वरूप
दरम्यान सोलापुरातही दमदार पावस झाल्यामुळे शहरातील खेळाच्या मैदानाला तळ्याचे स्वरूप आले आहे. काल दुपारपासून रात्रभर मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. तर पावसामुळे शहरातील पंडित जवाहरलाल नेहरू शासकीय मैदानाला तळ्याचे स्वरूप आले आहे. त्याचबरोबर हरिभाई देवकरण विद्यालयासमोरही पाणी साचले आहे. तर शहरासह जिल्हाभरात मुसळधार पाऊसामुळे अनेक ठिकाणी पडझड आणि शेतीचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.