Monsoon Alert : महाराष्ट्रासह सहा राज्यांत पावसाचे थैमान; मराठवाडा, विदर्भात यलो अलर्ट

रविवारी पूर्व विदर्भात मराठवाड्यातील अकोला, नागपूर, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. सोमवारीही उत्तर कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील घाट संकुलात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. पालघर, नाशिक, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.

Monsoon Alert : महाराष्ट्रासह सहा राज्यांत पावसाचे थैमान; मराठवाडा, विदर्भात यलो अलर्ट
Follow us
| Updated on: Jul 24, 2022 | 11:50 PM

पुणे : महाराष्ट्रासह(Maharashtra) सहा राज्यांत पावसाने(Heavy rains) थैमान घातले आहे. त्यातच आता मराठवाडा(Marathwada), विदर्भात(Vidarbha) यलो अलर्ट(Yellow alert) जारी करण्यात आला अआहे. रविवारी विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक भागात पाऊस झाल्यानंतर हवामान खात्याने दोन्ही ठिकाणी यलो अलर्ट जारी केला आहे. रविवारी विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, उत्तर कोकणातील पालघरसह नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. यानंतर पुढील काही तासात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.

रविवारी पूर्व विदर्भात मराठवाड्यातील अकोला, नागपूर, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. सोमवारीही उत्तर कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील घाट संकुलात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. पालघर, नाशिक, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.

दरम्यान, मान्सून संपूर्ण देशात व्यापला असून जवळपास प्रत्येक राज्यात पावसाला प्रारंभ झाला आहे. आसाम, गुजरात, उत्तराखंडसह अनेक राज्यात पावसाने थैमान घातलेय.

गुजरात पाण्याखाली

मुसळधार पावसामुळे गुजरात पाण्याखाली गेले आहे. राज्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मेहसाणा येथे काही तासांतच रस्त्यांवर 2 ते 3 फुटांपर्यंत पाणी साचल्याचे दृश्य रविवारी पहायला मिळाले. सूरत, नवसारी, वलसाड, डांग आणि तापी येथील 5 जिल्ह्यांमध्ये संततधार पाऊस पडत होता. 7जुलैपासून राज्यात झालेल्या विविध घटनांमध्ये कमीत कमी 70 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

उत्तर प्रदेश, बिहार आणि बंगालमध्ये पावसाचा जोर वाढला

उत्तर प्रदेश, बिहार आणि बंगालमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. या तीनही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.रविवारी गुजरात, राजस्थान, पूर्व मध्यप्रदेश, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात मुसळधार पावसाने थैमान घातले. रायपूर आणि छत्तीसगडमध्ये अनेक भागात होत असलेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेय. पुढील चार ते पाच दिवसांत मध्यप्रदेशातील अनेक जिल्ह्यांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.