मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक, पुढच्या 48 तासात अतिवृष्टीचा इशारा
मुंबईसह ठाणे, कल्याण आणि कोकण परिसरात येत्या 48 तासात जोरदार अतिवृष्टीचा इशारा (IMD prediction) देण्यात आलाय. नाशिक, मरावठवाड्यात हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातही चांगला पाऊस अपेक्षित आहे. पण पावसामुळे मुंबईकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
मुंबई : भारतीय हवामान विभाग (IMD prediction) ने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 48 तासात राज्यातील बहुतांश भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण आणि कोकण परिसरात येत्या 48 तासात जोरदार अतिवृष्टीचा इशारा (IMD prediction) देण्यात आलाय. नाशिक, मरावठवाड्यात हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातही चांगला पाऊस अपेक्षित आहे. पण पावसामुळे मुंबईकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
ठाणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात 1679.50 मिमी पाऊस
गेल्या 24 तासात ठाणे जिल्ह्यात तब्बल 1 हजार 679.50 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस मुरबाड, उल्हासनगर, अंबरनाथ आणि कल्याणमध्ये झालाय.
पावसाची आकडेवारी 27 जुलै 2019
ठाणे – 160.00mm
कल्याण – 231.40mm
मुरबाड – 332.00mm
उल्हासनगर – 296.00mm
अंबरनाथ – 280.60mm
भिवंडी – 185.00mm
शहापूर – 195.00mm
विदर्भ मराठवाड्याला अजूनही पावसाची प्रतीक्षा
पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मुंबई विभागात समाधानकारक पाऊस झाला असला तरी मराठवाडा मात्र पावसाच्या प्रतीक्षेत आहे. मराठवाड्यातील एकाही जिल्ह्यात अजून समाधानकारक पाऊस झालेला नाही. शिवाय विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला असला तरी धरणांमध्ये मात्र पाणीसाढ्यात वाढ झालेली नाही.
पुणे जिल्ह्यात मुसळधार
गेल्या 15 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने पुणे जिल्ह्यात (Pune Rain) शुक्रवारपासून हजेरी लावली आहे. या पावसामुळे (Pune Rain) आळंदीमधील इंद्रायणी नदी (Indrayani River) दुथडी भरून वाहू लागली आहे. आंद्र आणि वडविळे धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने इंद्रायणी नदी दुथडी वाहू लागली. तर लोणावळ्यातही विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे भुशी डॅमकडे जाणारा मार्गही पर्यटकांसाठी बंद करण्यात आलाय. ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे पर्यटकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय.