Maharashtra Rain Update: मुंबईसह कोकणात पुढील पाच दिवस मुसळधार; पश्चिम महाराष्ट्रातही जोरदार बरसणार; विदर्भातही पाऊस

पालघर, रायगड, पुण्यातील काही जिल्हे, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधून सलग पाच दिवस जोरदार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणसह मुंबईमध्ये सलग पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याकडून कळवण्यात आले आहे.

Maharashtra Rain Update: मुंबईसह कोकणात पुढील पाच दिवस मुसळधार; पश्चिम महाराष्ट्रातही जोरदार बरसणार; विदर्भातही पाऊस
पावसाळ्यात कपड्यांना दुर्गंधी येतेय का?
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 10:39 PM

मुंबईः राज्यात आज ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली असली राज्यात आजपासून पुढील पाच दिवस राज्यातील विविध जिल्ह्यात दमदार पाऊस (Heavy Rain) पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबाकडून (Regional Meteorological Center Colaba) काही जिल्ह्यात हलका, मध्यम, जोरदार आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पालघर, ठाणे,मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग,कोल्हापूर, सातारा जिल्ह्यासह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. विदर्भातही आज पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे नद्या, धरणातून पाणीच पाणी झाले आहे.

कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातून उद्यापासून जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागात उद्या आणि परवा हलक्या पावसाची शक्यता आहे.

सांगली, सोलापूरात हलका पाऊस

तर येत्या 8 तारखेला मात्र या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांतून मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तर सांगली, सोलापूर जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.

नदीकाठी असणाऱ्या गावांना इशारा

पालघर, रायगड, पुण्यातील काही जिल्हे, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधून सलग पाच दिवस जोरदार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणसह मुंबईमध्ये सलग पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याकडून कळवण्यात आले आहे. पुढील पाच दिवस पाऊस जोरदार कोसळणार असल्याने नदीकडील गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जळगावसह अहमदनगर नाशिकमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस

तर धुळे,नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, अहमदनगर,सांगली,मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जळगाव, अहमदनगरसह सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विजांसह गडगडाट

तर ढगांच्या गडगडाटासह विजांसह जोरदार वारा पावसाची शक्यता पुढील दोन ते तीन दिवस जालना, परभणी, बीड आणि हिंगोली जिल्ह्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहेत, तर काही भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.