नाशिकमध्ये 15 ऑगस्टपासून हेल्मेट सक्ती, नियम मोडल्यास किती दंड ठोठावणार?

15 ऑगस्टपासून पुन्हा एकदा नाशिक शहरात हेल्मेट सक्ती लागू करण्यात येणार असल्याने नाशिककरांना आता हेल्मेट घालूनच प्रवास करावा लागणार आहे.

नाशिकमध्ये 15 ऑगस्टपासून हेल्मेट सक्ती, नियम मोडल्यास किती दंड ठोठावणार?
Follow us
| Updated on: Aug 01, 2021 | 2:57 PM

नाशिकः गेल्या काही दिवसांपासून दुचाकीस्वारांचे अपघात वाढलेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा हेल्मेटसक्ती कडक करण्यात आलीय. 15 ऑगस्टपासून पुन्हा एकदा नाशिक शहरात हेल्मेट सक्ती लागू करण्यात येणार असल्याने नाशिककरांना आता हेल्मेट घालूनच प्रवास करावा लागणार आहे. कारण आता नाशिक शहर पोलीस आयुक्तांनी अनोखी मोहीम राबवत हेल्मेट सक्ती केली आहे.

…तरच तुम्हाला गाडीत पेट्रोल भरता येणार

“नो हेल्मेट,नो पेट्रोल…” म्हणजे तुमच्याकडे हेल्मेट असेल तरच तुम्हाला गाडीत पेट्रोल भरता येणार आहे. मात्र याला काही नाशिककरांचा विरोध आहे, तर काहींनी मात्र या निर्णयाच स्वागत केलंय. नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दुचाकी चालकांना हेल्मेट घालण्याचे आवाहन केलेय. दुचाकीवरील होणाऱ्या अपघातांची संख्या, त्यात हेल्मेटची गरज लक्षात घेता आयुक्तांचा निर्णय घेतलाय. सर्व पेट्रोल पंप चालकांना सक्त सूचना देण्यात आल्या आहेत, की एखाद्या दुचाकीस्वाराने हेल्मेट घातले नसेल, तर त्याला इंधन देऊ नये.

1 जूनपासून हेल्मेटच्या नियमांतही बदल

विशेष म्हणजे 1 जूनपासून हेल्मेटच्या नियमांतही बदल करण्यात आले होते. त्यानुसार 1 जूनपासून देशात केवळ ब्रँडेड हेल्मेटचीच विक्री होत आहे. चांगल्या गुणवत्तेच्या ब्रँडेड हेल्मेटच्या विक्रीसाठी आणि ISI प्रमाणित नसलेल्या हेल्मेटची विक्री आणि निर्मिती रोखण्यासाठी नवा कायदा लागू केलाय. नियमांची पायमल्ली करणाऱ्यास 1 वर्षाचा तुरुंगवास आणि एक लाख ते पाच लाख रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होणार आहे.

…आता तरी हेल्मेट डोक्यावर दिसणार का?

नाशिककरांनी हेल्मेटचा वापर करावा, यासाठी अनेक क्लृप्त्या यापूर्वीही लढविल्या गेल्यात; मात्र तरीही बहुतांश नाशिककरांच्या अजूनही हेल्मेटला गांभीर्यानं घेतलेलं नाही. हेल्मेट डोक्यांवर कमी आणि दुचाकींच्या आरशांवर, तसेच पाठीमागे जास्त अडकविलेले अधिक पाहावयास मिळते. त्यामुळे आता जेव्हा दुचाकी चालविण्यासाठी पेट्रोलच मिळणार नाही, म्हटल्यावर हेल्मेट घालण्याशिवाय नाशिककरांकडे पर्याय नाही.

संबंधित बातम्या

आपणही रॉयल एनफील्ड हिमालयनचे चाहते आहात? मग कंपनी घेऊन येत आहे अपडेट आवृत्ती, पहा बाईकचा फर्स्ट लुक

KIA SBI YONO offer : तुम्हीही KIA कारच्या प्रेमात आहात? एसबीआयची भन्नाट ऑफर जरुर पाहा!

Helmet is compulsory in Nashik from 15th August, how many fines will be imposed for breaking the rules?

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.