Nashik | कोविड अनुदानासाठी मदत कक्ष; कोणती कागदपत्रे करावी लागणार सादर, घ्या जाणून…

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कोविड 19 मुळे मृत पावलेल्या व्यक्तिच्या वारसांना 50 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान लवकरच देण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे 8744 जणांचा मृत्यू झाला आहे.

Nashik | कोविड अनुदानासाठी मदत कक्ष; कोणती कागदपत्रे करावी लागणार सादर, घ्या जाणून…
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Dec 19, 2021 | 7:05 AM

नाशिकः सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कोविड 19 मुळे मृत पावलेल्या व्यक्तिच्या वारसांना 50 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान लवकरच देण्यात येणार आहे. याबाबत संबंधितांना काही अडचण असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांतर्गत जिल्हा आणि महापालिका स्तरावर मदत व तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे 8744 जणांचा मृत्यू झाला आहे.

येथे मिळेल माहिती…

महसूल व वन आपत्तीव्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने प्रसारीत केलेल्या शासन निर्णयान्वये कोविड-19 आजारामुळे मृतांच्या निकटच्या नातेवाईकास सानुग्रह स्वरूपात मदत करण्यासाठी कमीत कमी कागदपत्रांच्या आधारे अर्ज सादर करण्यासाठी mahacovid19relief.in व https://epassmsdma.mahait.org/login.htm ही संकेतस्थळे उपलब्ध आहेत. त्यावर सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

येथे साधा संपर्क…

काही अडचण वाटल्यास जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी जिल्हा शल्य चिकित्सक मदत कक्ष 9607263456, नाशिक महानगरपालिका क्षेत्रासाठी 0253-2317292, 9607643366 व मालेगाव महानगरपालिका क्षेत्राकरिता 8956443070, 8956443068 हे मदत कक्ष व संपर्क क्रमांक निश्चित करण्यात आले आहेत. मृत व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकास आपल्या मोबाईलवरून स्वत:चा आधार क्रमांक, मृत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र व रुग्णालयाचा तपशील या कागदपत्रांच्या आधारे लॉगइन करता येणार आहे. अंतिमत: मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार सानुग्रह सहाय्याची रक्कम थेट अर्जदाराच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

यांना कागदपत्रांची गरज नाही…

केंद्र शासनाकडे ज्यांचा कोविड-19 या आजाराने मृत्यू झाल्याची नोंद झालेली आहे, अशा व्यक्तिंच्या नातेवाईकांचा अर्ज इतर कोणत्याही कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येणार आहे. इतर प्रकरणी कोविड-19 मुळे मृत्युचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र असेल तर अशी प्रकरणे देखील माहितीची शहानिशा करून मंजूर करण्यात येणार आहेत. अर्जदाराकडे मृत्युचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र नसेल तर कोविड-19 मुळे मृत्यू झाल्याची कागदपत्रे अर्जदारास अर्जासोबत सादर करावे लागणार आहेत.

ही कागदपत्रे सादर करणे बंधनकारक…

– अर्जदाराचा स्वत:चा तपशील, आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक. – अर्जदाराचा स्वत:चा बँक तपशील. – मृत पावलेल्या व्यक्तीचा आधार तपशील किंवा आधार नोंदणी क्रमांक – मृत व्यक्तीचे वैद्कीय प्रमाणपत्र (Medical Certificate of cause of Death) – मृताचा RT-PCR/Molecular Tests/RAT Positive अहवाल – मृताच्या रुग्णालयात दाखल असताना करण्यात आलेल्या आरोग्‍य चाचण्यांचा अहवाल – अर्जदाराच्या मते हा मृत्यू कोविड-19 मुळे झाल्याचे सिद्ध करत असेल, अशी इतर कोणतीही कागदपत्रे. – मृत पावलेल्या व्यक्तीचे जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, 1969 खालील मृत्यू प्रमाणपत्र – इतर निकट नातेवाईकांचे नाहरकत असल्याचा स्वयं घोषणापत्र

इतर बातम्याः

पहिल्याच वनडेमध्ये सचिनसोबत घडलेली ‘ती’ गोष्ट, तो कधीच विसरु शकत नाही!

Nashik | नाशिकमध्ये अतिशय लोकप्रिय ठरलेल्या सिटीलिंक बससेवेचा पहिला बळी; जबर धडकेत पादचारी गतप्राण!

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...