Ajit Pawar : भेटी दिल्या, मदतही द्या; चंद्रपूर, गडचिरोलीच्या नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीनंतर अजित पवारांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

सरकारने आदेश दिलेले पंचनामे पूर्ण झाले नाहीत. आता तातडीची मदत किमान दहा हजार रुपये व्हावी. शेतकऱ्यांना आत्महत्यांपासून परावृत्त करायचे असेल तर हेक्टरी 75 हजारांची म्हणजे एकरी 30 हजारांची मदत करावी, अशी मागणी अजित पवारांनी केली.

Ajit Pawar : भेटी दिल्या, मदतही द्या; चंद्रपूर, गडचिरोलीच्या नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीनंतर अजित पवारांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी
विरोधी पक्षनेते अजित पवारImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 5:56 PM

चंद्रपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटी दिल्या, पण शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. मात्र सत्ताधारी पक्ष आम्हालाच उशिरा आले असे म्हणतात, अशी टीका विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली आहे. ते चंद्रपुरात बोलत होते. येथील नुकसानग्रस्त भागाच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले असता त्यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विरोधी पक्षाच्या सर्व आमदार-खासगारांनी ओल्या दुष्काळाची (Wet drought) मागणी केल्याचेही ते म्हणाले. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याची पाहणी त्यांनी केली. ते म्हणाले, की चंद्रपूर येथे धान, कापूस, सोयाबीन पिकाचे नुकसान (Crop Damaged) झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 62-63 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

‘घरे कमकुवत’

अजित पवार म्हणाले, की नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या लाखाच्या घरात आहे. अजून पंचनामे झालेले नाहीत. शहरातील ओढ्यावर अतिक्रमण झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सांडपाणी व्यवस्थापन प्लांट नदीच्या शेजारी आहे. शहरात सिमेंट रस्ते आहेत. पण तिथे अंडरग्राऊंड ड्रेनेज नाही. नदीच्या शेजारी प्लॅाटिंग सुरू आहे. यामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. काहींची घरे दिसत आहेत. मात्र भिंती पूर्ण ओल्या झाल्या आहेत. त्या भिंती वाळल्यानंतर अशी घरे राहण्यायोग्य असणार नाहीत. ती कमकुवत होतील. त्यामुळे शासनाने त्याचाही पंचनामा करून मदत द्यावी, अशी मागणी पवार यांनी केली.

हे सुद्धा वाचा

अजित पवारांनी काय म्हटले?

‘एकरी 30 हजारांची मदत द्यावी’

चंद्रपूर मनपाची आर्थिक स्थिती चांगली नाही. सरकारने आदेश दिलेले पंचनामे पूर्ण झाले नाहीत. आता तातडीची मदत किमान दहा हजार रुपये व्हावी. शेतकऱ्यांना आत्महत्यांपासून परावृत्त करायचे असेल तर हेक्टरी 75 हजारांची म्हणजे एकरी 30 हजारांची मदत करावी. शेतकऱ्यांना दुबार पेरणी करता यावी, यासाठी शासनाने सहाय्य करावे, असे अजित पवार म्हणाले. दरम्यान, अधिकाऱ्यांनीदेखील जबाबदारीचे भान ठेऊन काम केले पाहिजे, असे ते म्हणाले. पुन्हा पुन्हा घटना घडू नये, याकरिता योग्य ती कार्यवाही शासनाने करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.