तीच जगणं असह्य, कधी काळची ‘ती’ सौदर्यवती, आता तिच्या मदतीसाठी सरसावल्या…

| Updated on: Jun 24, 2023 | 6:06 PM

कलाकारांसाठी राज्य सरकारने नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. तरीही अनेक कलाकार या मदतीपासून वंचित आहेत. अनेक कलाकारांवर आपल्या उतारवयात दयनीय अवस्थेत रहाण्याची वेळ आलीय.

तीच जगणं असह्य, कधी काळची ती सौदर्यवती, आता तिच्या मदतीसाठी सरसावल्या...
RUPALI CHAKANKR WITH SNEHLATA KOLHE
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

अहमदनगर : आपल्या कलाकाराच्या जोरावर तो तो काळ काळ गाजवणारे अनेक कलाकार महाराष्ट्रात आहेत. या कलाकारांसाठी राज्य सरकारने नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. तरीही अनेक कलाकार या मदतीपासून वंचित आहेत. अनेक कलाकारांवर आपल्या उतारवयात दयनीय अवस्थेत रहाण्याची वेळ आलीय. अशाच एक लावणी कलावंत. कधी काळी तिच्या लावण्यामुळे, तिच्या अदांमुळे महाराष्ट्र वेडा झाला होता. मात्र, तीच सौदर्यवती, लावण्यसम्राज्ञी आता अहमदनगरच्या कोपरगाव येथील बस स्टॅण्डवर राहून उपेक्षितांचे जीवन जगतेय. तिची ही कहाणी ऐकून महाराष्ट्रातील अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला. तिच्या मदतीसाठी अनेक हात पुढे आले.

हे सुद्धा वाचा

शांताबाई कोपरगावकर एक काळ गाजवणारी लावणी कलाकार. चाळीस वर्षांपूर्वी शांताबाई या एका नावामुळे तमाशाचा फड गर्दी करू लागला. हाती पैसे येऊ लागला. पण, भविष्याची चिंता न करता त्यांनी त्याच पैशातून अनेक संसार उभे केले. पण, त्यांच्या उतारवयात मात्र त्यांचाच संसार उघड्यावर पडला. महाराष्ट्राची ही लावणी सम्राज्ञी रस्त्यावर भीक मागू लागली. कोपरगाव बस स्थानक हेच तिचे घर बनले.

शांताबाई कोपरगावकर यांच्या बातम्यांनी महाराष्ट्र हेलावला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी याची दंभीर दखल घेतली. रुपाली चाकणकर यांनी आयोगाच्यावतीने तातडीने जिल्हा महिला बालविकास अधिकारी अहमदनगर यांच्याशी संपर्क केला.

शांताबाई यांची कहाणी कळताच त्यांना नगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर महिला बाल विकास विभागामार्फत शांताबाई यांची वृद्धाश्रमात व्यवस्था करावी असे निर्देश रुपाली चाकणकर यांनी अहमदनगर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांना दिले.

महाराष्ट्र शासनाने कलाकारांच्या निवृत्ती वयात त्यांना समाधानाने जगता यावे यासाठी काही योजना सुरू केल्या आहेत. शांताबाईंना राज्य शासनाच्या योजनांमधून सन्मान जनक मानधन मिळावे, निवृत्ती वेतन मिळावे यासाठी आयुक्त, महिला बाल विकास यांना पत्र लिहून शांताबाईंना मदत मिळवून देण्यासाठीचे निर्देशही राज्य महिलाच्या आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले.

स्नेहलता कोल्हे यांचा निवारा मिळवून देण्यासाठी पुढाकार

दुसरीकडे, भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी शांताबाई कोपरगावकर यांना निवारा मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. स्नेहलता कोल्हे यांनी कलावंत शांताबाई कोपरगावकर यांना शिर्डीतील द्वारकामाई वृद्धाश्रमात दाखल केले आहे. पुढचे काही दिवस त्यांना वृद्धाश्रमात ठेऊन त्यांची वैद्यकीय चाचणी करून पुढील उपचार करण्यात येणार आहेत.

पुढच्या काही दिवसात सरकारची मदत घेऊन शांताबाई कोपरगावकर यांना घरकुल देण्याचाही प्रयत्न स्नेहलता कोल्हे करणार आहेत. दरम्यान, शांताबाई कोपरगावकर यांना द्वारकामाई वृद्धाश्रमात दाखल करण्यापूर्वी शिर्डी येथे त्यांनी साईबाबांचे दर्शन घेतले.