रेमडेसिव्हीर आणलेल्या ‘त्या’ खासगी विमानाची माहिती सादर करा, कोर्टाचे आदेश; सुजय विखेंच्या अडचणी वाढणार ?

रेमडेसिव्हीर इंजेक्शनसाठी शिर्डी विमानतळ येथे उतरवण्यात आलेल्या खासगी विमानाची माहिती सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. (sujay vikhe remdesivir)

रेमडेसिव्हीर आणलेल्या 'त्या' खासगी विमानाची माहिती सादर करा, कोर्टाचे आदेश; सुजय विखेंच्या अडचणी वाढणार ?
Follow us
| Updated on: Apr 29, 2021 | 7:56 PM

औरंगाबाद : रेमडेसिव्हीरचे 300 इंजेक्शन थेट दिल्लीहून मागवल्यामुळे भाजप खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्या अडचण्याची शक्यता आहे. रेमडेसिव्हीर (Remdesivir) इंजेक्शनसाठी शिर्डी विमानतळ येथे उतरवण्यात आलेल्या खासगी विमानाची माहिती सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. ही माहिती गृह विभागाचे मुख्य सचिव सादर करतील. दिल्लीवरुन रेमडेसिव्हीर इंजेक्शन आणल्याप्रकरणी सुजय विखे पाटील यांच्याविरोधात औरंगाबाद हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. अरुण कडू आणि इतर तीन जणांनी ही याचिका दाखल केली आहे. याच याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने वरील आदेश दिले. या प्रकरणावर पुढील सुनावणी 3 मे रोजी होईल. (high court ordered to give all information of private plane used by Sujay Vikhe to bring remdesivir from Delhi to Shirdi )

न्यायालयाचे आदेश काय ?

सुजय विखे यांनी दिल्लीहून रेमडेसिव्हीर इंजेक्शन आणल्याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आज (29 एप्रिल) सुनावणी घेण्यात आली. सुनावणीदरम्यान 10 एप्रिल 2021 ते 25 एप्रिल 2021 या काळात शिर्डी विमानतळ येथे आलेल्या एका खासगी विमानाची माहिती सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले. तसेच विमानतळ आणि परिसरातील cctv फुटेजसुद्धा सादर करावेत असे राज्याच्या गृह विभागाचे प्रधान सचिव यांना कोर्टाने सांगितले.

सुजय विखेंच्या क्लिप न्यायालयात सादर

यावेळी याचिकाकर्त्यांच्या वकील प्रज्ञा तळेकर यांनी याचिकाकर्त्यांची बाजू मांडली. त्यांनी सुजय विखे यांनी प्रसारित केलेल्या व्हिडीओ क्लिप न्यायालयात सादर केल्या.

याचिकाकर्त्यांची मागणी काय?

खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी अहमदनगरमध्ये रेमडिसव्हीर इंजेक्शनचं वाटप केले होते. हे वाटप बेकायदेशीर आहे. वाटण्यात आलेली इंजेक्शन खरी होती की बोगस होती याबाबत काहीच माहीत नाही. हे वाटप बेकायदेशीर झालं आहे. त्यामुळे याबाबत तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.

नेमके प्रकरण काय आहे ?

सुजय विखे यांनी कोणताही गाजावाजा न करता थेट दिल्लीवरुन रेमडिसिव्हर इंजेक्शनचा (Remdesivir injection) मोठा कोटा आणला होता. सुजय विखे यांनी खाजगी विमान करुन 300 रेमडिसिव्हर इंजेक्शन्स अहमदनगरला आणली होती.  त्यासाठी त्यांनी 22 एप्रिल पासून नियोजन सुरु केले होते. त्यानंतर रेमडेसिव्हीर यशस्वीरित्या नगरमध्ये आणल्यानंतर त्यांनी 24 एप्रिल रोजी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन याबाबतची माहिती दिली होती. यावेळई “ही इंजेक्शन्स सर्व पक्षातील लोकांसाठी आहेत. कोणी याचे राजकारण करू नये, मी मुद्दाम दोन दिवस लेट हा व्हिडीओ अपलोड केला. नाहीतर माझ्यावर कारवाई झाली असती” असं सुजय विखे पाटील म्हणाले होते.

दरम्यान, सुजय विखेंचे वकील आणि याचिकाकर्त्यांची बाजू ऐकून न्यायालयाने जिल्हाधिकारी यांची भूमिका काय आहे, हेसुद्धा न्यायालयाला सांगावे असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता तीन मे रोजी होईल.

इतर बातम्या :

संपूर्ण महाराष्ट्राला सुरक्षित करायचं तर काय करावं? इंग्लंड, जर्मनी, कॅनडाचा फॉर्म्युला, वाचा सविस्तर

राज्यातला लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवला, कडकडीत बंद होणार, निर्बंधांमध्ये वाढ

(high court ordered to give all information of private plane used by Sujay Vikhe to bring remdesivir from Delhi to Shirdi )

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.