Nanded | ग्राहकांना मिरची झोंबणार, Dharmabad इथल्या लाल मिरचीला उच्चांकी भाव
नांदेडमध्ये (Nanded) तिखट मिरचीसाठी (Chillis) प्रसिद्ध असणाऱ्या धर्माबाद (Dharmabad) इथल्या बाजारात मिरचीचे आगमन झाले आहे. सध्या मिरचीला प्रति क्विंटल बावीस हजार रुपये इतका उच्चांकी भाव मिळतोय. अतिवृष्टीमुळे उत्पादनात घट झाल्याने मिरचीने चांगलाच भाव खाल्ला आहे.
नांदेडमध्ये (Nanded) तिखट मिरचीसाठी (Chillis) प्रसिद्ध असणाऱ्या धर्माबाद (Dharmabad) इथल्या बाजारात मिरचीचे आगमन झाले आहे. सध्या मिरचीला प्रति क्विंटल बावीस हजार रुपये इतका उच्चांकी भाव मिळतोय. अतिवृष्टीमुळे उत्पादनात घट झाल्याने मिरचीने चांगलाच भाव खाल्ला आहे. तेलंगाणा राज्याच्या सीमेवर असलेल्या धर्माबाद इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या रोज शंभर ते दीडशे क्विंटल मिरचीची आवक होतेय. याच ठिकाणी मिरची पावडर बनवणारे अनेक कारखाने असून सध्या तीनशे रुपये किलो दराने मिरची पावडरीची विक्री होतेय. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना यंदा लाल मिरची चांगलीच झोंबताना दिसत आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत मिरचीचे भाव प्रतिक्विंटर पाच ते सहा हजार रुपयांनी वाढले आहेत. अतिवृष्टीचा फटका मिरचीला बसला आहे. तर आता ग्राहकांनाही त्याचा फटका बसणार आहे.
Latest Videos