राणे आत्ता खुनी दिसतायत, मुख्यमंत्री केले तेव्हा काय धुतल्या तांदळाचे होते का? शिवसेनेला हिंगोलीतून घरचा आहेर

हिंगोलीचे माजी खासदार अ‍ॅड. शिवाजी माने यांनी दोन वेळा शिवसेनेच्या तिकिटावर खासदारकी भूषवली असून काही काळ काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सदस्यत्व घेतल्यानंतर पुन्हा ते शिवसेनेत परतले आहेत.

राणे आत्ता खुनी दिसतायत, मुख्यमंत्री केले तेव्हा काय धुतल्या तांदळाचे होते का? शिवसेनेला हिंगोलीतून घरचा आहेर
शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी माने
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 10:58 AM

हिंगोलीः महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra politics) सध्या भाजप आणि शिवसेनेमध्ये जे काही आरोप-प्रत्यारोप चालले आहेत, त्यामुळे राजकारण अत्यंत खालच्या दर्जावर घसरले असून यामुळे सामान्य शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. हे कुठे तरी थांबलं पाहिजे. तसंच ज्याच्या घामातून शिवसेना पुढे आली त्या नारायण राणेंविरोधात शिवसेनेने बोलू नये, शिवसेनेसाठी त्याने किती खून पाडले, हे विसरू नये आणि राणेंनीदेखील मातोश्रीविरोधात काही बोलू नये, अशी कळकळीची विनंती एका ज्येष्ठ शिवसैनिकाने केली आहे. हे आहेत हिंगोलीचे (Hingoli MP) माजी शिवसेना खासदार अ‍ॅड. शिवाजी माने (Shivaji Mane). शिवाजी माने यांनी दोन वेळा शिवसेनेच्या तिकिटावर खासदारकी भूषवली असून काही काळ काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सदस्यत्व घेतल्यानंतर पुन्हा ते शिवसेनेत परतले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या आजी-माजी नेत्यांमधील कलह उघडा पडू नये, यामुळे सामान्य शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

काय म्हणाले अ‍ॅड. शिवाजी माने?

शिवसेनेचे माजी खासदार अ‍ॅड शिवाजी माने यांनी शिवसेनेला घरचा आहेर दिलाय. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून भाजप आणि शिवसेना वादावर भाष्य केले आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल प्रचंड व्हायरल होत आहे. त्यात ते म्हणतात, शिवसेना भाजप बरोबर किंवा नारायण राणे यांच्या विरुद्ध ज्या पद्धतीने वागतेय, ते योग्य नाही. राणे साहेबांच्या घामामधून शिवसेना पुढे आलेली आहे हे शिवसेनेने विसरता कामा नाही. त्यांच्या विरोधात शिवसेनेने आता बोलू नाही, त्यांनी काय केलं आणि किती खून पाडले यावर बोलू नाही. आणि राणेसाहेबांनीसुद्धा मातोश्री विरोधात बोलण्याचे काही कारण नाही. ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीविरुद्ध आमच्यासारखा फाटका शिवसैनिक आयुष्यभर लढला त्याच शिवसैनिकाचं स्वप्न पूर्ण होत नाहीये…. ‘ अशी खंत शिवाजी माने यांनी बोलून दाखवली. ते पुढे म्हणाले, ‘ आम्ही अनेक वर्षे ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधात लढलो, प्रसंगी स्वतःवर गुन्हे नोंदवून घेतले. त्या काँग्रेस राष्ट्रवादी विरोधात मात्र शिवसेना भाजप बोलायला तयार नाहीये. पण अनेक वर्षे ज्या भाजप सोबत शिवसेनेचं सख्य होत. त्या भाजप विरोधात मात्र शिवसेना रोज काही ना काही नवे मुद्दे उकरून काढून भांडण काढीत असते. हे शिवसैनिकांचं मोठ दुर्दैव आहे. हा सगळा तमाशा काँग्रेस राष्ट्रवादीवाले मात्र रिंगणाच्या बाहेरून पाहत आहेत असंही माने म्हणाले… यामुळे शिवसेनेला हा घरचा आहेर मानला जातोय.

कोण आहेत शिवाजी माने?

अ‍ॅड. शिवाजी माने हे हिंगोली जिल्ह्यातील ज्येष्ठ शिवसेना नेते आहेत. 1996 ला शिवसेना तिकिटावर खासदार झाले. दोन वेळा त्यांनी शिवसेन्चाय तिकिटावर खासदारकी भूषवली. 2004 मध्ये मात्र लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 2006 मध्ये त्यांनी या परभवासाठी शिवसेनेचे स्थानिक नेते जबाबदार असल्याची उघड भूमिका मांडली. 2008 ला ते काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेसने त्यांना जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती, त्या वेळी त्यांनी काँग्रेसचे बहुसंख्य जिल्हा परिषद सदस्य निवडून आणले होते. नंतर काँग्रेसमध्ये राजीव सातव अ‍ॅक्टिव्ह झाले. त्यामुळे पक्षात माने आणि सातव यांचे जमत नसल्याने माने यांनी 2014 साली काँग्रेसला राम राम ठोकला व राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. 2015 च्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने माने यांना एकही तिकीट दिले नसल्याने माने पुन्हा नाराज झाले व त्यांनी 2015 ते 2019 पर्यंत त्यांनी राष्ट्रवादीत दिवस काढले. पुन्हा 2019 च्या निवडणुकीत घर वापसी केली आमदार संतोष बांगर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आखाडा बाळापूर येथे सभेसाठी आले असता त्यांनी भर सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला आता ते सध्या शिवसेनेत आहेत.

इतर बातम्या-

भाजपचे 16 नगरसेवक राष्ट्रवादीच्या उंबरठ्यावर, अजितदादा म्हणतात, रुको रुको जरा सबर करो!

‘दोन वर्षात टीम इंडियासाठी खेळायचंय’, रणजी ट्रॉफी डेब्यू सामन्यात दोन शतकं ठोकणाऱ्या यश धुलचा इरादा पक्का!

Non Stop LIVE Update
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.