Hingoli | 10 वर्षीय मुलीचा रस्ता अडवून अतिप्रसंग, 16 वर्षीय मुलावर गुन्हा दाखल, हिंगोलीत धक्कादायक प्रकार!

हिंगोली जिल्ह्यातीलच सेनगाव येथील हा प्रकार समोर आल्याने मुले अशा गुन्हेगारी वृत्तीकडे कसे वळत आहेत, याबाबत पालकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

Hingoli | 10 वर्षीय मुलीचा रस्ता अडवून अतिप्रसंग, 16 वर्षीय मुलावर गुन्हा दाखल, हिंगोलीत धक्कादायक प्रकार!
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 26, 2022 | 11:53 AM

हिंगोलीः हिंगोली जिल्ह्यात पोलिसांचा (Hingoli police) धाक उरला नसल्याने आता अल्पवयीन मुले ही गुन्हेगारीचा मार्गावर जात आहेत. औंढा तालुक्यातील (Aundha) ढेगज येथे अल्पवयीन मुलांनी दुसऱ्या अल्पवयीन मुलाला जीवे ठार केल्याची घटना ताजी असतांना सेनगाव तालुक्यात (Sengaon) आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन मुलाने दहा वर्षाच्या चिमुकलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. सदर मुलीच्या तक्रारीनंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. अल्पवयीन मुलाने असा प्रकार केल्याने पालकवर्गात खळबळ माजली आहे. अल्पवयीन मुले अशा प्रकारच्या गुन्हेगारी मार्गावर जात असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

काय घडल सेनगावात?

सेनगाव तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. या गावातील 10 वर्षीय मुलगी गावातून एकटी शेताकडे जात होती. त्यावेळी 16 वर्षीय युवकाने तिचा रस्ता अडवला. तिच्या गळ्यातील ओढणीने तिचं तोंड दाबून काही अंतरावर उचलून नेत तिचे अर्धवट कपडे काढून विनयभंग करीत तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यापुढे जाऊन कुणाला काही याबाबद्दल सांगितले तर तर तुला खतम करतो अशी धमकी ही दिली. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून बाललैगिक आत्याच्यार संरक्षण कायदा 354 (अ) 506 भादवि प्रमाणे सेनगाव पोलिसात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पालकवर्गात खळबळ

अल्पवयीन मुलाने अशा प्रकारचे कृत्य केल्याने हिंगोली जिल्ह्यात खळबळ माजली आहे. दोन दिवसांपूर्वीच औंढा तालुक्यातील ढेगज येथे अल्पवयीन मुलाने आपल्या मित्राचा गळा आवळून खून केल्याची घटना समोर आली होती. मित्राने आपल्या बहिणीचा फोटो त्याच्या मोबाइलमध्ये काढल्याचा राग मनात धरत हे कृत्य करण्यात आले होते. एका मित्राने इतर साथीदारांच्या मदतीने गळा आवळून हा खून केला होता. त्यानंतर हा मृतदेह बाथरूममध्ये ठेवला. पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतर ही घटना आणि त्यामागील कारण उघडकीस आले. त्यातील आरोपीदेखील अल्पवयीन असल्याने पालकवर्गात चांगलीच खळबळ माजली होती. आता हिंगोली जिल्ह्यातीलच सेनगाव येथील हा प्रकार समोर आल्याने मुले अशा गुन्हेगारी वृत्तीकडे कसे वळत आहेत, याबाबत पालकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

इतर बातम्या-

Innova Crysta : अख्ख बॉलिवूड आहे ‘या’ कारवर फिदा… पोटातलं पाणीदेखील हलत नाही….

MPSC : एमपीएसीच्या परीक्षेच्या उत्तरसुचीत चुका, लोकसेवा आयोगाकडे विद्यार्थ्यांनी सादर केले पुरावे

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.