हिंगोलीतील ‘कोरोना’चं सावट गडद, 25 SRPF जवानांना ‘कोरोना’, रुग्णसंख्या 47 वर

नव्याने सापडलेल्या 26 कोरोनाबाधित रुग्णांमध्ये 25 जण एसआरपीएफचे जवान आहेत. तर नांदेडहून पंजाबला गेलेल्या हिंगोलीच्या व्यक्तीलाही लागण झाली आहे (Hingoli SRPF Jawan Corona Positive)

हिंगोलीतील 'कोरोना'चं सावट गडद, 25 SRPF जवानांना 'कोरोना', रुग्णसंख्या 47 वर
Follow us
| Updated on: May 01, 2020 | 11:30 AM

हिंगोली : हिंगोलीतील ‘कोरोना’चं सावट गडद करणारी धक्कादायक बातमी समोर आली आहे. हिंगोलीत एका दिवसात ‘कोरोना’चे तब्बल 26 नवे रुग्ण सापडले आहेत. विशेष म्हणजे यापैकी 25 जण हे राज्य राखीव पोलिस दलाचे जवान आहेत. अवघ्या दहा दिवसांपूर्वी हिंगोली जिल्हा ‘कोरोना’मुक्त झाल्याची घोषणा झाली होती, मात्र इतक्या कमी दिवसात रुग्णसंख्या फोफावून पन्नाशीच्या उंबरठ्यावर आल्याने धाकधूक वाढली आहे. (Hingoli SRPF Jawan Corona Positive)

हिंगोलीतील कोरोनाबधितांची संख्या गेल्या 24 तासात 21 वरुन थेट 47 वर गेली आहे. यापैकी एका रुग्णाला डिस्चार्ज मिळाला असून 46 जणांवर उपचार सुरु आहेत. हिंगोलीवासियांचं कोरोनामुक्त झाल्याचं स्वप्न आधी एकदा विरलं होतं, आता रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने उलट चिंता वाढत आहे.

कालच्या दिवसात (30 एप्रिल) नव्याने सापडलेल्या 26 कोरोनाबाधित रुग्णांमध्ये 25 जण एसआरपीएफचे जवान आहेत. तर नांदेडहून पंजाबला गेलेल्या हिंगोलीच्या व्यक्तीलाही लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.

हेही वाचा : हिंगोली जिल्हा 4 वाजता ‘कोरोना’मुक्त, 8.30 वाजता सहा नवे रुग्ण

याआधी, हिंगोली जिल्ह्यातील पहिल्या कोरोना रुग्णाचा रिपोर्ट 16 एप्रिलला निगेटिव्ह आला होता. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 21 एप्रिलला दुपारी चार वाजता हिंगोली जिल्हा ‘कोरोना’मुक्त झाल्याची घोषणा केली होती, मात्र त्याच दिवसात, अवघ्या साडेचार तासांमध्ये सहा नवे रुग्ण आढळल्याने हिंगोली जिल्ह्याची ‘कोरोना’मुक्ती औटघटकेची ठरली होती.

त्यावेळी एसआरपीएफच्या सहा जवानांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं.  मालेगाव आणि मुंबईतून हिंगोलीत आलेल्या 194 जवानांना क्वारंटाइन करुन ठेवण्यात आलं होतं. त्यापैकी 95 जवानांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते, तर सहा जवानांना कोरोनाची लागण झाली होती. आता पुन्हा एसआरपीएफच्या जवानांना लागण झाल्याने भीती वाढली आहे. (Hingoli SRPF Jawan Corona Positive)

नांदेडमध्ये तीन बस चालकांना ‘कोरोना’

दरम्यान, नांदेडमध्ये अडकलेल्या पंजाबच्या भाविकांना सोडण्यासाठी गेलेल्या तीन बस चालकांना ‘कोरोना’ची लागण झाली आहे. पंजाबहून परत आल्यानंतर घेतलेल्या कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नांदेडहून गेलेल्या पंजाबमधील शंभरहून अधिक पर्यटकांना ‘कोरोना’ची लागण झाल्याचा दावा केला जात आहे.

नांदेडमध्ये गेल्या चोवीस तासात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नांदेडकरांची धाकधूक वाढली आहे. नांदेडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 5 वर पोहोचली आहे.

(Hingoli SRPF Jawan Corona Positive)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.