या ३५ विद्यार्थ्यांचा अंतराळ संशोधन संस्थांचा अभ्यासदौरा, या संस्थांना देणार भेट

सात हजार विद्यार्थ्यांनी या परीक्षेत भाग घेतला. त्यापैकी ३५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. आठ दिवस हे विद्यार्थी भेट देणार आहेत.

या ३५ विद्यार्थ्यांचा अंतराळ संशोधन संस्थांचा अभ्यासदौरा, या संस्थांना देणार भेट
Follow us
| Updated on: Apr 17, 2023 | 2:59 PM

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात जगातील दुसऱ्या नंबरची प्रयोगशाळा होऊ घातली आहे. २०१३ पासून हा प्रकल्प रखडला होता. त्यासाठी सरकारने २६ शे कोटी रुपये मंजूर केले आहेत. आधी हा जिल्हा हळदीसाठी ओळखला जात होता. आता हा जिल्हा वैज्ञानिकांसाठी ओळखला जाईल. अंतराळ संस्थाना भेट देत असताना राकेटचं उड्डाण होतं. ते या विद्यार्थ्यांना पाहायला मिळणार आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये परीक्षा घेण्यात आल्या. सात हजार विद्यार्थ्यांनी या परीक्षेत भाग घेतला. त्यापैकी ३५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. आठ दिवस हे विद्यार्थी भेट देणार आहेत. अशी माहिती खासदार हेमंत पाटील यांनी दिली.

HINGOLI 2 N

नांदेडमध्ये विद्यार्थ्यांचा सत्कार

हिंगोली जिल्ह्यातील सरकारी शाळेतील 35 विद्यार्थी हे देशातील प्रमुख अंतराळ संशोधन संस्थाच्या अभ्यास दौऱ्यावर रवाना झालेत. हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी नांदेडमध्ये या विद्यार्थ्यांना एकत्र बोलावून त्यांचा सत्कार केला. स्पर्धा परीक्षेत निवड झालेले हे 35 विद्यार्थी हरिकोटा, तिरुअनंतपूरम, बेंगळुरू, चेन्नई आणि हैद्राबाद इथल्या राष्ट्रीय अंतराळ प्रयोगशाळांना भेटी देणार आहेत.

दौऱ्यासाठी वीस लाखांचा निधी

लहानपणापासून विद्यार्थ्यांना संशोधनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी जिल्हा विकास निधीतून वीस लाखांचा निधी या अभ्यास दौऱ्यासाठी देण्यात आलाय. त्यातून गोरगरीब घरातील मूल देशातील नामांकित अंतराळ संस्थेचा अभ्यास दौरा करायला निघाले आहेत. अंतराळ संस्थेचा अभ्यास दौरा करायला निघालेल्या या मुलांमध्ये मोठी उत्सुकता दिसून आलीय.

जगातील दुसऱ्या क्रमांकाची प्रयोगशाळा येथे होणार

अंतराळ संस्थेच्या दौऱ्यावर जाणारी विद्यार्थिनी प्राची म्हणाली, ही ठिकाण बघायची आहेत. पुढं चालून वैज्ञानिक बनणार आहे. दुसरी विद्यार्थिनी म्हणाली, पहिल्यांदा जाणार आहे. तिथं मिळालेलं ज्ञान दुसऱ्यांना देईन. या सहलीबद्दल उत्सुक होते. जगातील दुसऱ्या क्रमांकाची प्रयोगशाळा दुघाळा गावात होणार आहे. त्यामुळे या परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

या विद्यार्थ्यांसोबत प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, शिक्षणाधिकारी प्रा. संदीप सोनटक्के, उपशिक्षणाधिकारी नितीन नेटके, गटशिक्षणाधिकारी संगीत जाधव, विज्ञान समन्वयक बालाजी काळे, विजय बांगर, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राजक्ता मेने, डॉ. माया पवार यांचे पथक जाणार आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.