Hingoli | अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या दोन तरूणांचा जागीच मृत्यू, हिंगोली शहरातील धक्कादायक घटना!

अनिल आणि गणेश पोलिस भरतीची तयार सोबतच करत असल्याचे कळते आहे. दोघेही व्यायाम करण्यासाठी वसमत शहरातील कवठा रोडवर जात असत. सकाळी पहाटे जाऊन रनिंग आणि इतर पोलिस भरतीचे व्यायाम करायचे. अनिल आणि गणेश दोघेही अत्यंत मेहनती तरूण होते. मात्र, काळाने त्यांची स्वप्नपूर्ण होण्याच्या अगोदरच घाला घातला आहे.

Hingoli | अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या दोन तरूणांचा जागीच मृत्यू, हिंगोली शहरातील धक्कादायक घटना!
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 02, 2022 | 12:39 PM

हिंगोली : हिंगोली (Hingoli) जिल्हात एक धक्कादायक घटना उघडकीस आलीयं. पोलीस भरतीचा सराव करत असतांना अज्ञात वाहनाने उडवल्याने दोन तरुणांचा मृत्यू (Death) झाला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जातंय. अनिल आमले व गणेश गायकवाड अशी मृत्यू झालेल्या दोन तरुणांची नावे आहेत. हे दोन्ही तरूण केल्या काही वर्षांपासून पोलिस (Police) भरतीची तयारी करत होती. मात्र, काळाने घावा घालत या दोन्ही तरूणांचे स्वप्न भंग केले. अनिल आमले आणि गणेश गायकवाड हे दोघे मित्र होते.

अनिल आमले आणि गणेश गायकवाड तरूणांचा जागीच मृत्यू

वसमत शहरातील रहिवाशी असलेले अनिल आमले व गणेश गायकवाड हे दोघे नेहमीप्रमाणे आज पोलिस भरतीचा सराव करण्यासाठी गेले होते. शहरा लगत असलेल्या खंदारे पेट्रोल पंपजवळ या दोघांना अज्ञात वाहनाने धडक दिली या धडकेत दोघेही जागीच ठार झाले आहेत. दरम्यान जवळपास असलेल्या नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली आणि मृतदेह वसमतच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात पाठवले.

हे सुद्धा वाचा

दोन्ही तरूण पोलिस भरतीचा सराव करत होते

अनिल आणि गणेश पोलिस भरतीची तयारी सोबतच करत असल्याचे कळते आहे. दोघेही व्यायाम करण्यासाठी वसमत शहरातील कवठा रोडवर जात असत. सकाळी पहाटे जाऊन रनिंग आणि इतर पोलिस भरतीचे व्यायाम करायचे. अनिल आणि गणेश दोघेही अत्यंत मेहनती तरूण होते. मात्र, काळाने त्यांची स्वप्नपूर्ण होण्याच्या अगोदरच घाला घातला आहे.

अज्ञात वाहनाने उडवल्याने तरूणांचा मृत्यू

पोलिस भरतीसाठी तयारी करत असलेले अनिल आणि गणेश भल्या पहाटे वसतम शहरातील कवठा रोडवर व्यायामासाठी जात होते. तेथे ते दररोजच व्यायाम करायचे. मात्र, आज सकाळी एका अज्ञात वाहनाने त्यांना धडक देऊन उडवले. आज सकाळी 5 वाजताच्या सुमारास ही घटना घडलीयं. या धडकेमध्ये दोन्ही तरूणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलीस आता अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.