मुंबई : हिंगोली जिल्ह्यातील एका प्रेमवेड्या तरुणाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना भावनिक पत्र (Emotional letter) लिहिलं आहे. या पत्रात मुख्यमंत्रीसाहेब, तुम्ही कधी प्रेम केलं आहे का? असा सवाल त्याने मुख्यमंत्र्यांना केलाय. शेतकरी असल्याने प्रेम करण चुकीचं आहे का? असा सवाल त्याने या पत्रातून विचारला आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Latter) होतंय. हिंगोलीतील व्हायरल होणाऱ्या या पत्रात कुणाचंही नाव नाहीये. पण हे पत्र हिंगोली जिल्ह्यातील एक तरुण शेतकऱ्याने लिहिलं असल्याचं या पत्रातील मजकुरावरून लक्षात येतंय. त्याने थेट मुख्यमंत्र्यांना तुम्ही कुणावर प्रेम केलंय का असा प्रश्न विचारलाय. हे पत्र सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे
“उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब, पत्र लिहितांना खुप दुःख होत आहे. प्रेम धन दौलतीवर अवलंबून आहे का…? मी प्रेम केलं पण मला शेतजमीन कमी आहे म्हूणन माझ्या प्रेमाला विरोध होत आहे. तुम्ही जनतेचे प्रश्न सोडवता. तुम्ही ही कधी तरी प्रेम केलं आहे का? केलं असेल तर उत्तर दया…” असं म्हणत या तरूणाने थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सवाल विचारलाय. हिर-रांझा, लैला -मजनु, सोनी-महिवाल यांनी प्रेम केलं तर त्यांना मृत्यू का? प्रेमात विरह का? साहेब शेतकरी होऊन प्रेम करणं चुकीचं आहे का? खरं तर तुम्हाला भेटून खुप रडाव वाटतंय कारण आजपर्यंत तुम्ही सगळ्यांचे प्रश्न सोडवले. तुम्ही सगळ्यांचं ऐकून घेता मग माझं का नाही?” असा प्रश्न या तरुणाने उद्धव ठाकरे यांना केलाय.
“या पुरोगामी महाराष्ट्रात प्रेमात आत्महत्या करावी लागत असेल तर मी अशा प्रेमाचा धिक्कार करतो. माझ्या प्रश्नांची उत्तरं दया… मी तुमच्या उत्तराची वाट पाहात आहे. अन्यथा माझ्याकडे आत्महत्या करण्यापलीकडे दुसरा पर्याय नाहीये… “, असा या पत्रातील मजकूर आहे.
हिंगोलीतील व्हायरल होणाऱ्या या पत्रात कुणाचंही नाव नाहीये. पण हे पत्र हिंगोली जिल्ह्यातील एक तरुण शेतकऱ्याने लिहिलं असल्याचं या पत्रातील मजकुरावरून लक्षात येतंय. त्याने थेट मुख्यमंत्र्यांना तुम्ही कुणावर प्रेम केलंय का असा प्रश्न विचारलाय. हे पत्र सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
संबंधित बातम्या