Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hingoli Suicide: हिंगोलीत अज्ञात कारणावरुन तरुण दाम्पत्याची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या, आकस्मिक मृत्यूची नोंद

दरम्यान या तरुण दाम्पत्याने आत्महत्या का केली हे अद्याप कळू शकले नाही. याबाबत पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस सखोल तपास करीत आहेत. वडिलांच्या निधनानंतर रामदास आणि शितल हे दोघेच घरी असायचे.

Hingoli Suicide: हिंगोलीत अज्ञात कारणावरुन तरुण दाम्पत्याची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या, आकस्मिक मृत्यूची नोंद
डॉ. रेखा कदम यांच्या घराची झडती, काळवीटाचे कातडे जप्त
Follow us
| Updated on: Jan 03, 2022 | 4:12 PM

हिंगोली : अज्ञात कारणावरुन पती पत्नीने एकाच दोरीने झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना सेनगाव तालुक्यातील दाताडा शिवारामध्ये घडली आहे. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. रामदास बाळू इंगळे(24) आणि शितल रामदास इंगळे(22) अशी मयत पती पत्नीची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.

झाडाला गळफास घेत दाम्पत्याने केली आत्महत्या

विदर्भातील मढी या गावातील शितल हिचे सेनगाव तालुक्यातील वाघजळी येथील रहिवासी रामदास इंगळे याच्याशी तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. रामदास इंगळे आणि शितल इंगळे हे दांपत्य सेनगाव तालुक्यातील वाघजाळी येथील मूळचे रहिवासी असले तरी त्यांनी दाताडा शिवारात शेत विकत घेऊन त्याच ठिकाणी आखाडा बांधला होता. या दांपत्याचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. रामदास इंगळे यांचे वडील बाळू इंगळे यांचे सहा महिन्यांपूर्वीच निधन झाले आहे. रामदासची पत्नी शितल ही विदर्भातील मढी या गावी आपल्या माहेरी गेली होती. दोन दिवसापूर्वीच रामदास पत्नीला मढी गावातील तिच्या माहेरुन आपल्या घरी परत घेऊन आला होता. त्यानंतर आज सकाळी आठच्या सुमारास दाताडा शिवारात दोघांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. याबाबत ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतले.

आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही

दरम्यान या तरुण दाम्पत्याने आत्महत्या का केली हे अद्याप कळू शकले नाही. याबाबत पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस सखोल तपास करीत आहेत. वडिलांच्या निधनानंतर रामदास आणि शितल हे दोघेच घरी असायचे. कुटुंबात या दोघांविरोधात अन्य कुणीही नव्हते. दोघे गरीब कुटुंबातील होते. मोलमजुरी करुन आपला उदरनिर्वाह चालवत होते. मात्र कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून हाताला काम मिळत नव्हते. त्यामुळे संसाराचा गाडा कसा चालवायचा हा यक्षप्रश्न पुढे होताच. कदाचित आर्थिक विवंचनेमुळे मानसित ताण येऊन त्यांनी आत्महत्या करीत आपली जीवनयात्रा संपवली असावी, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे. (In Hingoli, a young couple committed suicide by hanging themselves from a tree for unknown reasons)

 इतर बातम्या

Jalgaon| चटका लावणारी घटना, जळगावमध्ये अकरावीच्या विद्यार्थ्याच्या गिरणेच्या डोहात बुडून मृत्यू

‘मी जगण्याचा खूप प्रयत्न केला, पण काय करू प्राँब्लेम संपतच नाहीत म्हणत’ तरुणानं उचललं हे पाऊल…..

'त्यांना सांगायचं दादांना...', अजित पवार एसपी कॉवत यांच्यावर संतापले
'त्यांना सांगायचं दादांना...', अजित पवार एसपी कॉवत यांच्यावर संतापले.
कळंबच्या त्या महिलेच्या हत्येनंतर 'तो' दोन दिवस मृतदेहासोबत झोपला अन्
कळंबच्या त्या महिलेच्या हत्येनंतर 'तो' दोन दिवस मृतदेहासोबत झोपला अन्.
आधे इधर, आधे उधर... बीडमध्ये वाल्मिक कराडवर मेहरनजर?
आधे इधर, आधे उधर... बीडमध्ये वाल्मिक कराडवर मेहरनजर?.
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.