हिंगोली : एक भीषण अपघात (Major Accident) झाला असून या अपघातातील ट्रकच्या चाकाखाली चिरडून काही जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जाते आहे. हा अपघात इतका भीषण होता, की काहीचा जागीच मृत्यू (Death) झाल्याचाही संशय व्यक्त केला जातो आहे. दरम्यान, या भीषण अपघातात किती जणांचा मृत्यू झाला,याचा आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही. एक प्रवासी ट्रॅव्हल्स आणि ट्रकची एकमेकांना धडक बसून हा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भयंकर होता, की ट्रक (Truck) आणि ट्रॅव्हल्स (Travels Bus) दोन्हीही रस्ता सोडून शिवारात घुसल्याचं पाहायला मिळालंय.
नांदेड-हिंगोली मार्गावरील (Hingoli-Nanded Route) कळमनुरी तालुक्यातील पार्डीमोड (Pardimod) शिवारात हा भीषण अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच तातडीनं पोलिस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले आहेत. या अपघातात बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले असून काहींवर काळानं घाला घातलाय.
नेमका हा अपघात कशामुळे झाला हे कळू शकलेलं नाही. मात्र अपघातानंतर काही जण हे चक्क ट्रकच्या खालच्या बाजूला अडकल्याचं दिसून आलं आहे. एका महिलेचा मृतदेह ट्रकच्या चाकामध्ये अडकल्याचं चित्रही या अपघातानंतर पाहायला मिळालंय. अनेक प्रवाशांना या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.
या भीषण अपघातात दोन ते तीन महिला जागीच दगावल्या असल्याची भीती व्यक्त केली जाते आहे. तर एक प्रवासी अपघातात मार लागून थेट ट्रकच्या खाली अडकला गेला. या प्रवाशाला वाचवण्यासाठी स्थानिकांनी मदत केली. ट्रकच्या खाली अडकून पडलेल्या या प्रवाशाला बाहेर काढण्यासाठी तातडीनं प्रयत्न करण्यात आले. त्याशिवाय एक महिला या अपघातात जखमी होऊन रक्तबंबाळ झाली होती.
सध्या या अपघाताचा पंचनामा पोलिसांकडून केला जातो आहे. तर जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. लवकरच या अपघातातील मृतांचा आकडा स्पष्ट होईल. मात्र तूर्तास मृतांच्या संख्येबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. सध्या या अपघात झालेल्या ठिकाणी बचावकार्य केलं जात आहे.
VIDEO | कॉफी शॉपमध्ये गुप्त जागा, अश्लील चाळे करताना प्रेमी युगुलं रंगेहाथ
नारायण राणेंच्या बंगल्यावर पोलिसांची नोटीस, दहाच मिनिटात राणेंच्या कर्मचाऱ्याने नोटीस काढली?