Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange : ते तर सरकारचे मुकादम, मनोज जरांगे पाटलांचा छगन भुजबळांवर पुन्हा हल्लाबोल, अजून दौऱ्याचे पाच टप्पे बाकी, सरकारला सूचक इशारा

Manoj Jarange On Chagan Bhujbal : मनोज जरांगे पाटील सध्या मराठा आरक्षण शांतता रॅलीच्या माध्यमातून मराठवाडा पिंजून काढणार आहे. त्यांनी मागण्यांसाठी सरकारला 13 जुलैपर्यंतची डेडलाईन दिली आहे. त्यापूर्वीच त्यांनी सरकारसह छगन भुजबळ यांच्यावर बोचरी टीका केली.

Manoj Jarange : ते तर सरकारचे मुकादम, मनोज जरांगे पाटलांचा छगन भुजबळांवर पुन्हा हल्लाबोल, अजून दौऱ्याचे पाच टप्पे बाकी, सरकारला सूचक इशारा
Follow us
| Updated on: Jul 07, 2024 | 10:43 AM

मनोज जरांगे पाटील सध्या मराठा आरक्षण शांतता रॅलीच्या माध्यमातून मराठवाडा पिंजून काढणार आहेत. शनिवारी हिंगोलीपासून त्यांच्या रॅलीचा श्रीगणेशा झाला. आज ते परभणीत दाखल झाले आहेत.त्यांनी सरकारला 13 जुलै या डेडलाईनची आठवण पण करुन दिली. त्यापूर्वी त्यांनी छगन भुजबळांसह राज्य सरकारवर बोचरी टीका केली. त्यामुळे विधानसभेपूर्वी यावर रीतसर तोडगा निघाला नाही, तर हा विषय राज्य सरकारची डोकेदुखी वाढवणार असे दिसते.

भुजबळ तर मुकादम

मराठा आरक्षणाविषयी बोलताना काही जणांचे त्यात आमचे पण, त्यांचे पोट दुखत आहे, असा टोला जरांगे पाटील यांनी लगावला. आपल्या नेत्याला काही आमिष दिले का, काय सर्व जाती धर्माचे लोक आता कामाला लागले आहेत. छगन भुजबळ हे मुकादम आहेत. तेच सर्व करत आहेत. कुणबी आणि मराठा एक आहे. त्यांनी बाकीच्या जाती पोट जाती म्हणून घातल्या आहेत. भुजबळ यांना सरकार सांगत म्हणून ते आम्हाला त्रास देत आहेत, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला. पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक विषयावर रोखठोक भूमिका मांडली.

हे सुद्धा वाचा

ओबीसींचे सहकार्य

प्राध्यापक लक्ष्मण हाके यांना विरोधक मानत नाही. हे जे काही घडविण्याचे काम सुरु आहे, त्यामागे भुजबळ असल्याचा आरोप त्यांनी केला. छगन भुजबळ जे करतायत ते सामान्य लोकांना चांगलं वाटत नाही. आमच्या नोंदी सापडलेल्या असताना नाही म्हणणं, मराठ्यांच्या नोंदी सापडलेल्या असताना आपला नेता मराठ्यांना का आरक्षण द्यायचं नाही म्हणतो असं सामान्य ओबीसी लोकांना वाटतंय म्हणून ओबीसी आंदोलनात सहभागी होत असल्याचा दावा त्यांनी केला.

आम्ही मागणीवर ठाम

आमची कोणतीही मागणी बदललेली नाही. भुजबळ यांनी 10-20 लोक हाताशी धरले आणि त्यांना ते बोलायला लावतायत. आमच्या आरक्षणामुळे धनगर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. देव जरी आला तरी धक्का लागत नाही. तुम्ही ST आरक्षणासाठी लढा तुमच्या पाठीशी मनोज जरांगे आधी उभा राहील. कुणबी मराठा एकच आहे त्यामुळे ओबीसीतून आरक्षण देण्याची पहिल्या दिवसापासून आमची मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ओबीसीच नाही तर मराठ्यांना पण पाडा

विधानसभेसाठी 288 उमेदवार उभे करायचे ठरले तर सगळ्या जाती धर्माचे लोक उभे करणार, सगळ्या जातीचे उभे राहू द्या. ओबीसींच्याच नाही मराठ्यांना त्रास देणाऱ्या मराठ्यांच्या नेत्यांना देखील पाडा, मराठ्यांना त्रास व्हायला नको, अशी जाहीर भूमिका त्यांनी घेतली. 288 निवडून द्यायचे की पाडायचे हे अजून ठरायचे आहे अजून 5 टप्पे दौऱ्याचे बाकी आहे. 57 लाख नोंदी सापडल्यात,तरी दीड कोटी मराठा आरक्षणात गेला आहे या आंदोलनामुळे 10 टक्के आरक्षण मिळालेलं आहे पण हे टिकणार नाही त्यामुळे आमचा लढा सुरू आहे, असे त्यांनी सरकारला ठणकावले.

जयंत पाटील मुरलेले नेते आहेत, त्यांचा अंदाज लावणं कठीण - एकनाथ शिंदे
जयंत पाटील मुरलेले नेते आहेत, त्यांचा अंदाज लावणं कठीण - एकनाथ शिंदे.
'राज ठाकरे भांग पिऊन बोलतात', माजी मंत्र्यांची टीका, मनसेकडूनही पलटवार
'राज ठाकरे भांग पिऊन बोलतात', माजी मंत्र्यांची टीका, मनसेकडूनही पलटवार.
संतोष देशमुखांसाठी गाव एकवटलं, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा मोठा निर्णय
संतोष देशमुखांसाठी गाव एकवटलं, मस्साजोगच्या ग्रामस्थांचा मोठा निर्णय.
जजसोबत सक्तीच्या रजेवरच्या पोलिसांची होळी? दमानियांकडून थेट फोटो ट्विट
जजसोबत सक्तीच्या रजेवरच्या पोलिसांची होळी? दमानियांकडून थेट फोटो ट्विट.
नैसर्गिक रंगात न्हाऊन निघत धसांनी लुटला धुळवडीचा आनंद
नैसर्गिक रंगात न्हाऊन निघत धसांनी लुटला धुळवडीचा आनंद.
बापाच्या आठवणीने व्याकूळ, भास होताच वैभवीनं रेखाटलं देशमुखांचं चित्र
बापाच्या आठवणीने व्याकूळ, भास होताच वैभवीनं रेखाटलं देशमुखांचं चित्र.
वाल्मिक कराडच्या आडून पोलिसांवर निशाणा, तृप्ती देसाई गोत्यात येणार?
वाल्मिक कराडच्या आडून पोलिसांवर निशाणा, तृप्ती देसाई गोत्यात येणार?.
पक्ष डुबला तरी चालेल, आपण हलता कामा नये; शिरसाटांची राऊतांवर खोचक टीका
पक्ष डुबला तरी चालेल, आपण हलता कामा नये; शिरसाटांची राऊतांवर खोचक टीका.
'शिवतीर्थ'वर ठाकरे रंगले; कुटुंब, कार्यकर्त्यांसोबत धूळवड साजरी
'शिवतीर्थ'वर ठाकरे रंगले; कुटुंब, कार्यकर्त्यांसोबत धूळवड साजरी.
जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय? आधी सूचक वक्तव्य अन् आता म्हणताय...
जयंत पाटलांच्या मनात नेमकं काय? आधी सूचक वक्तव्य अन् आता म्हणताय....