Marathi News Maharashtra Hingoli Mid day meal scheme in Hingoli, MLA Santosh Bangar's allegations dismissed by manager, saying it was for dumping food in...
Mid-day meal scheme : हिंगोलीतील मध्यान्न भोजन योजना, आमदार संतोष बांगर यांचे आरोप व्यवस्थापकाने फेटाळले, म्हणाले, ते अन्न डम्पिंगमध्ये फेकण्यासाठीचे…
बांगर यांनी कानशीलात लगावली. तो मीच होतो. मला कल्पना नव्हती. मला मारतील म्हणून. मी सामान्य नागरिक आहे. मला हे अपेक्षित नव्हतं, असंही ते म्हणाले.
हिंगोली : महाराष्ट्रात काही ठिकाणी मध्यान्ह भोजन योजना सुरू करण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यात सदर योजना सुरू आहे. गावा गावात जाऊन कामगारांना जेवण पुरवले जात आहेत. मात्र हे सगळं भोजन निकृष्ट दर्जाच असल्याचा आरोप आमदार संतोष बांगर यांनी केला. या भोजन पुरविणाऱ्याच्या चौकशीची मागणी (Inquiry Demand) केली आहे. लिंबाळा येथील मध्यान्ह भोजनच्या किचनची आमदार संतोष बांगर यांनी सकाळी पाहणी केली. मात्र बांगर यांचे सगळे आरोप वेस्टेज अन्न होतं असं म्हणत गुनीना कमर्शियल (Gunina Commercial) प्रा. लि. मध्यवर्ती स्वयंपाकघर, हिंगोलीचे व्यवस्थापक शुभम हर्णे (Shubham Harne) यांनी फेटाळले आहेत. ते सगळं अन्न उरलेलं म्हणजे वापस आलेलं होतं. ते सगळ डंपिंगमध्ये नेऊन टाकतो. आमदार बांगर आले आणि त्याचेच व्हिडीओ शूट केले. आमदार बांगर यांनी घेतलेल्या व्हिडीओमधील सगळं अन्न वेस्टेज होतं, असं स्पष्टीकरण आता व्यवस्थापक हर्णे यांनी दिलेत.
40 पेक्षा जास्त कामगार काम करतात. सकाळ आणि संध्याकाळ लोकांना जेवण पुरवतो. सकाळी 28 हजार आणि संध्याकाळी 18 हजार. पण, ह्या संबंधित चुकीची माहिती देत आहे. एकूण खर्च किती येतोय ह्यावर याच माझ्याकडे स्पष्टीकरण नाही. मुंबई येथील व्हिटी येथून काम चालतं. बांगर यांनी कानशीलात लगावली. तो मीच होतो. मला कल्पना नव्हती. मला मारतील म्हणून. मी सामान्य नागरिक आहे. मला हे अपेक्षित नव्हतं, असंही ते म्हणाले. आमदारांनी त्यांच्या कानशिलात लगावली होती.
कंपनीविरोधात कारवाई करण्याची मागणी
कामगार कल्याण मंडळाकडून असंघटित कामगारांसाठी महाराष्ट्रात काही ठिकाणी मध्यान्ह भोजन योजना सुरू आहे. हिंगोली जिल्ह्यात गावा-गावात जाऊन टेम्पोच्या माध्यमातून कामगारांना डब्बे पुरवले जात आहेत. मात्र हे सगळं भोजन निकृष्ट दर्जाच असल्याचा आरोप आमदार संतोष बांगर यांनी केला आहे. लिंबाळा येथील मध्यान्ह भोजनाच्या किचनची आमदार संतोष बांगर यांनी पाहणी केली. त्या ठिकाणी सर्व भाजीपाला अक्षरशः जनावरे खाणार नाहीत. गोबी, सडलेले कांदे, बुरशी लागलेल्या पोळ्या व डाळी नेमून दिलेल्या दिवसांचा मेनू दिला जात नाही. जे भोजन दिले जाते ते निकृष्ट दर्जाच्या असल्याचे बांगर यांनी सांगितलं. यात सुधारणा नाही झाली तर टाळं अशा कंपनीवर ठोकणार. तात्काळ कार्यवाही करून बेड्या ठोकण्याची मागणी आमदार संतोष बांगर यांनी केली.