नारायण राणेंनी अस्वस्थ होण्याचं कारण काय?, बाळासाहेब थोरात म्हणाले…
वारकरी सांप्रदायामध्ये जय हरी, राम राम, नमस्ते असं म्हणत असतो. आता हे सक्ती करता येते, असं नाही.
रमेश चेंडगे, Tv9 मराठी, प्रतिनिधी, हिंगोली : राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे आज भारत जोडो पदयात्रेच्या निमित्ताने हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी बातचित केली. काँग्रेस संपली काँग्रेसला आता कुणी वाली राहिला नाही, असं विधान केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी केले होते. यावर बाळासाहेब थोरात यांना विचारलं असता ते म्हणाले, त्यांनी काँग्रेस सोडली आहे. भारत जोडो पदयात्रेला मिळत असलेला प्रतिसाद बघितल्यानंतर ते अस्वस्थ झाले आहेत. त्या अस्वस्थेतून ते काहीही बोलत आहेत, असं थोरात म्हणाले.
आशिष शेलारांचं ट्वीट
काँग्रेसच्या भारत जोडोला पेंग्विन सेनेची साथ दसरा मेळाव्यासाठी काँग्रेस देणार हात.आशिष शेलारांनी ट्विट केलंय. यावर बाळासाहेब थोरात म्हणाले, ही पदयात्रा चालली आहे. यात्रा प्रतिसाद आपण पाहत आहोत.
मुद्दाम आपण पाहावं की, कर्नाटकात हजारोनं लोक पाठीशी चालत आहेत. हे पाहिल्यानंतर भारतीय जनता पार्टी अस्वस्थ झाली आहे. ते अस्वस्थ होण्यातून बोलताहेत. याला काही महत्त्व नाही. काँग्रेसचा विचार हा दूरगामी देशाला मोठा करणारा विचार आहे.
आपल्या राज्य राज्यघटनेतले मूलभूत तत्व आमचा विचार आहे. तो शास्वत विचार आहेत. आम्ही हा शास्वत विचार पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. भेद निर्माण करणाऱ्यांनी काय बोलावं हा त्यांचा विषय आहे.
ही तर व्यक्तिगत बाब
शासकीय कर्मचाऱ्यांना फोनवर हॅलोऐवजी वंदे मातरम म्हणावे लागणार, असा शासन निर्णय सारकारकडून काढण्यात आलाय. यावर थोरातांनी ही बाब व्यक्तिगत आहे म्हटलं.
आपण कोणी भेटलं तर, वारकरी सांप्रदायामध्ये जय हरी, राम राम, नमस्ते असं म्हणत असतो. आता हे सक्ती करता येते, असं नाही. मात्र यावर त्यांनी जीआर काढला. मात्र ही व्यक्तिगत बाब असल्याचं थोरात म्हणाले.