Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hingoli Murder | मुलीच्या छेडछाडीवरून वाद, हिंगोलीत गळ्यावर वार करून तरुणाचा खून

हिंगोलीत गळ्यावर सपासप वार करून तरुणाचा खून करण्यात आलाय. शहरातील तालाब कट्टा परिसरात रात्रीच्या सु्मारात ही घटना घडली. शुभमराजे असं मृतकाचं नाव आहे.

Hingoli Murder | मुलीच्या छेडछाडीवरून वाद, हिंगोलीत गळ्यावर वार करून तरुणाचा खून
हिंगोलीत गळ्यावर सपासप वार करून तरुणाचा खून करण्यात आलायImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 2:50 PM

हिंगोली : भाचीच्या छेडछाडीचा बदला घेण्यासाठी एका तरुणाचा गुप्ती व खंजीराने वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. शुभम राजे (वय 23 ) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हिंगोली पोलिसांनी (Hingoli Police) तिघांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील (Hingoli city) तलाव कट्टा भागातील मृत शुभम राजे (Shubham Raje) व आरोपी यांच्यात काही दिवसांपूर्वी मुलीच्या छेडछाडीवरून वाद झाला होता. याचाच राग आरोपी याच्या मनात होता. 19 एप्रिलच्या पहाटे आरोपी आणि त्याच्या अन्य काही मित्र तलाबकट्टा परिसरात आले.

शरीरावर गुप्ती, खंजीराने वार

हिंगोलीत गळ्यावर सपासप वार करून तरुणाचा खून करण्यात आलाय. शहरातील तालाब कट्टा परिसरात रात्रीच्या सु्मारात ही घटना घडली. शुभमराजे असं मृतकाचं नाव आहे. यावेळी आरोपींनी शुभमला बोलून घेत त्याच्याबरोबर पुन्हा वाद करून त्याच्या शरीरावर गुप्ती, खंजीर लोखंडी पाइपने सपासप वार करायला सुरुवात केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे शुभम जागीच कोसळला. त्यानंतर हल्लेखोरांनी घटना स्थळावरून पळ काढला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली.

तिघांना ठोकल्या बेड्या

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. आरोपीच्या अटकेसाठी कोम्बिंग ऑपरेशन सुरु करत तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी मयत शुभम राजे यांच्या आई शोभा राजे यांच्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात बबलू धाबे व अन्य दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Curfew in Achalpur | अचलपुरात संचारबंदीचा दुसरा दिवस, शाळा-महाविद्यालयाच्या परीक्षा पुढं ढकलल्या; गावात तणावपूर्ण शांतता

Nitin Raut on Population | यंदाचं वर्ष लोकसंख्या नियंत्रण वर्ष म्हणून घोषित करा, डॉ. नितीन राऊत असं का म्हणालेत?

Chandrapur Temperature | चंद्रपुरात वीज वितरण यंत्रांनाच कुलर्स, का घेतली जातेय विशेष खबरदारी?

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.